Agrowon Podcast : तुरीच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत आजचे केळीचे दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, केळी, तूर आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये घट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे कमी होऊन ९.७० डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ३१५ डाॅलरवर बंद झाले होते. पण देशात मात्र सोयाबीनचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात चढ उतार

कापसाच्या भावातही चढ उतार सुरुच आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. तर देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव काहिसे सुधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीचा परिणाम भावावर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ७०.९९ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर  देशातील वायद्यांमध्ये कापूस वाढून ५६ हजार ९९० रुपये प्रतिखंडीवर बंद झाला होता. कच्च्या कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Agriculture Market
Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Agriculture Market
Ginners RCM Tax : जिनर्सवरील आरसीएम कर पाचवरून एक टक्‍का करा

तुरीमध्ये काहिशी सुधारणा

तुरीच्या बाजार मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरु झाले आहेत. मागील एक महिन्यात तुरीची आयात वाढल्यानंतर तुरीच्या भावावर काहिसा परिणाम झाला होता. भाव काहिसे नरमले होते. मात्र तुरीला उठाव मिळत असल्याने पुन्हा तुरीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली. नवा माल बाजारात दाखल होण्याला आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा दिसून आली. सध्या तुरीला सरासरी ९ हजार ४०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.  

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com