Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Price: राज्यातील बेदाण्याचे दर टिकून राहण्याचे अंदाज

Raisin Market Update: चीनमधून भारतात बेकायदेशीरपणे बेदाणा आल्याच्या बातम्यांमुळे गेल्या आठ दिवसांत बेदाण्यांच्या दरात प्रति किलो सरासरी ३० रुपयांची घट झाली. परंतु चीनमधून आलेल्या बेदाण्याचे प्रमाण किती हे अजून स्पष्ट झालेले नाही.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: चीनमधून भारतात बेकायदेशीरपणे बेदाणा आल्याच्या बातम्यांमुळे गेल्या आठ दिवसांत बेदाण्यांच्या दरात प्रति किलो सरासरी ३० रुपयांची घट झाली. परंतु चीनमधून आलेल्या बेदाण्याचे प्रमाण किती हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दरातील घट तात्पुरती असून राज्यातील बेदाण्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी घाबरून घाईघाईने बेदाणा विक्री करू नये, तर बाजारातील दरस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील बेदाण्याला देशांतर्गतच मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतात बेदाण्याला मोठी मागणी असते. गतवर्षी द्राक्ष पिकावर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले होते. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादन घटले. नुकत्याच संपलेल्या हंगामात सुमारे १ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. हंगामाच्या प्रारंभापासून बाजारात बेदाण्‍याची मागणी आणि उठाव यामुळे दरही चांगले मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाण्याचे दर दुप्पट राहिले.

बाजारात बेदाण्याच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात मार्च, एप्रिल, मे आणि जून या चारही महिन्यांत टप्प्याटप्प्याने बेदाण्याचे दर वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आज अंदाजे ५५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. त्यापैकी ६० टक्के शेतकऱ्यांकडे आहे. राज्यातील बेदाण्याची विक्री बेकरी उत्पादने आणि खाद्यपदार्थांसाठी उत्तर आणि दक्षिण भारतात होते. सण-समारंभ, दैनंदिन वापरासाठीही बेदाणा वापर जास्त आहे.

चीनचा बेदाणा नेपाळमार्गे भारतात आला. तस्करीद्वारे आलेला बेदाणा विक्री होण्यापूर्वी जप्त करावा. तसेच भारतात आयात करणारी कंपनी, व्यापारी यांच्यावर केंद्राने कारवाई करावी. संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत.
मारुती चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे
चीनबरोबर इतर देशांतून बेदाण्याची आयात थांबवण्याची जबाबदारी केंद्राची आहे. परंतु या बेदाण्यामुळे देशातील बेदाण्याच्या दरावर फारसा परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी घाई गडबडीत बेदाणा विक्री करू नये. बाजारातील दराची परिस्थिती पाहूनच टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी नियोजन करावे. आठ दिवसांपासून दर कमी झाले असले तरी, ते टिकून राहतील असा अंदाज आहे.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचे भाव दबावातच; टोमॅटो दरात सुधारणा, मेथीचा भाव टिकून, बटाटा आणि डाळिंबाला उठाव कायम

Papaya Harvesting : खानदेशात आगाप पपई काढणीवर

Nagpur APMC Corruption: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा! विधानसभेत मागणी, मंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

Cotton Procurement : अकोटमधील कापूस खरेदीतील अनियमितेच्या चौकशीसाठी समिती

Urea Demand : बुलडाण्यात युरियाची मागणी वाढली

SCROLL FOR NEXT