Raisin
RaisinAgrowon

Chinese Raisins: चीनचा बेदाणा नेपाळमार्गे आयात शुल्कविना भारतात

Indian Market Update: भारतीय बेदाण्याला बाजारात चांगली मागणी असल्याने हंगामात समाधानकारक स्थिती होती. मात्र चीनच्या बेदाण्याची नेपाळमार्गे तस्करी होऊन भारतात विक्री होत आहे.
Published on

Nashik News: भारतीय बेदाण्याला बाजारात चांगली मागणी असल्याने हंगामात समाधानकारक स्थिती होती. मात्र चीनच्या बेदाण्याची नेपाळमार्गे तस्करी होऊन भारतात विक्री होत आहे. त्याचा फटका भारतीय बेदाण्याच्या दरावर होत असून दरात काहीशी पडझड झाली आहे. हा बेदाणा प्रामुख्याने बिहारमधील पटणा व गया शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

यंदाचा द्राक्ष हंगाम आव्हानात्मक असल्याने बेदाणा उत्पादन उशिराने झाले. यामुळे यंदा सरासरी ६० ते ८० रुपये दर अधिक मिळत असल्याने बेदाणा उत्पादकांना काहीसा दिलासा होता. अशातच या तस्करीमुळे बेदाणा उत्पादक व व्यापारी वर्ग अडचणीत सापडला आहे. भारतीय बेदाण्याच्या तुलनेत चीनचा बेदाणा कमी दरात विक्री होत असल्याने विक्रीवर दबाव वाढता असल्याने कोंडी वाढण्याची स्थिती आहे.

Raisin
Raisin Price: बेदाण्याच्या दरात मोठी सुधारणा

बिहारमधील पटणा व गया येथे विक्री होत असल्याबाबतचे चिनी बेदाण्याचे पुरावे समोर आले असून, हा बेदाणा चीनमधील बोंजोर कंपनीचा आहे. तो हत्तीबन, काठमांडू (नेपाळ) येथील ‘पूजा स्पाइसेस अँड पॅकेजिंग’ या कंपनीने आयात केल्याचे खोक्यावरील छापील मजकुरावरून समोर आले आहे. ही गंभीर बाब महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढे आणली आहे.

Raisin
Raisin Rate: बेदाण्याचे दर स्थिर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधून आयात होणाऱ्या मालावर आयात शुल्क नाही. असे असताना चीनचा माल विनाआयात शुल्क भारतीय बाजारात आणला जाऊन विकला जात आहे. गंभीर बाब म्हणजे, चीनचा बेदाणा बेकायदेशीर पद्धतीने तस्करी होऊन नेपाळमार्गे भारतात आल्याने राष्ट्रीय सुरक्षासह आयात धोरणावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक व व्यापारी अडचणीत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारचे आयात शुल्क न भरता माल आल्याचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

द्राक्ष बागायतदार संघाचा पाठपुरावा

चीनचा बेदाणा तस्करी होऊन नेपाळमार्गे आल्याने हा गंभीर प्रकार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन गंभीर प्रकरणाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. याबाबत लेखी निवेदन द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, कोशाध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिले. बेदाणा उत्पादक व केंद्र सरकारचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी संघाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com