Amravati News: जमिनीची सुपीकता व पिकाची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ हर्षद ठाकूर यांनी व्यक्त केले. ‘सकाळ-ॲग्रोवन’ व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘ॲग्रो संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते..लोणी येथील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम झाला. पुढे बोलताना श्री. ठाकूर यांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचे महत्त्व स्पष्ट करून रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेतीतील घटक, जसे की जिवामृत, घन जिवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून जमिनीची सुपीकता व पिकांची प्रतिकारशक्ती कशी वाढविता येते, या बाबत सविस्तर माहिती दिली..Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार.तूर पिकातील मुख्य कीड-रोग जसे की पाने खाणारी, शेंगा पोखरणारी सोबतच मर रोग व वांझ रोग यांची लक्षणे, निरीक्षण आणि नियंत्रणाचे उपाय सांगण्यात आले. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया व मातीमध्ये किंवा शेणखतामध्ये हे मिसळून वापर केल्यास मूळकुज व मर रोग सारखे बुरशीजन्य रोग तसेच जमीन वाढलेली खराब बुरशी नियंत्रणात येते, असे सांगितले. .रायझोबियम व फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया (PSB) या सूक्ष्मजीवांद्वारे बीजप्रक्रियेने नत्र व फॉस्फरस उपलब्धता वाढून पिकाची वाढ व दर्जा सुधारते, असेही नमूद करण्यात आले. हरभरा पिकासाठी विद्यापीठांनी विकसित केलेल्या नव्या वाणांबद्दल माहिती देताना त्यांचा उच्च उत्पादनक्षमतेसह रोगप्रतिकारक स्वभाव शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे सांगण्यात आले. .Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक.या वेळी सरपंच प्रतीक्षा आकरे, उपसरपंच मंगला शेवटकर, बुद्धिजीवी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या अध्यक्ष मीना सोळंके, कंपनीचे सचिव सारिका आडे, दहिगाव येथील पोलिस पाटील विनोद चोपडे उपस्थित होते. .प्रास्ताविक कंपनीचे सदस्य बबलू आंडे यांनी केले. या वेळी कंपनीची उभारणी, गट बांधणी, कंपनीमार्फत केलेले प्रस्तावामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, ट्रॅक्टर तसेच बचत गटामार्फत केलेले प्रस्तावामध्ये टोकन यंत्र, ग्रास कटर, महिला कुटीर उद्योग विषयी आवश्यक मशिनरी, ग्रेव्ही कटर इत्यादी प्रस्तावा बाबत त्यांनी माहिती दिली..नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी कृषिविषयक योजनांची सविस्तर माहिती दिली. नुकत्याच प्रसारित झालेल्या महाविस्तार ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे सदस्य बबलू आंडे यांनी केले. .तर सूत्रसंचालन आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रेरणा डफळे यांनी केले. ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सचिन शोगोकर यांनी आभार मानले. या वेळी रवी मानकर, मोहन गादे तसेच बुद्धिजीवी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सर्व सभासद उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.