Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Transportation : नोव्हेंबरमध्ये रेल्वेने कांद्याची वाहतूक सुरू होण्याची शक्यता

Onion Market : बाजार समित्यांमध्ये कमी झालेली कांद्याची आवक व देशावर कांद्याच्या भावात तेजी असल्याने सध्या रेल्वे मार्गाने गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याची वाहतूक मंदावल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Nashik News : बाजार समित्यांमध्ये कमी झालेली कांद्याची आवक व देशावर कांद्याच्या भावात तेजी असल्याने सध्या रेल्वे मार्गाने गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याची वाहतूक मंदावल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वाणिज्य विभागाने कांदा व्यापारी व कार्डिंग एजंट यांच्याशी बैठक घेत आढावा घेतला आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या लोडिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे नाशिक रोड स्थानकावर मुख्य वाणिज्य प्रबंधक अरविंद मालखेडे, भुसावळ मंडळचे वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी, कांदा व्यापारी व कार्टींग एजंट यांची नुकतीच बैठक झाली.

या वेळी लासलगाव, मनमाड, अंकाई किल्ला परिसरातील कांदा व्यापारी व कार्टिंग एजंट या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत कांद्याच्या लोडिंगसंदर्भात आढावा घेण्यात आला व सध्या कांद्याची लोडिंग कमी झाल्याने यासंबंधी चर्चा करण्यात आली. सध्या रब्बी उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली आहे.

तसेच नवीन खरीप कांदा नोव्हेंबरच्या मध्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लोडिंग सुरू करण्यात येईल, असेही व्यापारी व कार्टिंग एजंट यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच कांदा वाहतुकीतील अडचणी व रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा या संबंधी चर्चा करण्यात आली.

उत्तर पूर्व भारतात जाणार कांदा

कांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाना, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल व इतर ठिकाणी पाठविला जाणार आहे. कांद्याच्या लोडिंग संदर्भात लासलगाव, कसबे सुकेणे या ठिकाणी पाहणी करून मुख्य वाणिज्य प्रबंधकांनी या संदर्भात सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निरीक्षणाद्वारे स्थानकांवरील आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT