Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Kolhapur Vegetable Market : कोल्हापूर बाजार समितीत कर्नाटकातून कांद्याची मोठी आवक वाढली आहे तर सीमाभागातून कोथिंबीरचे ट्रक येत आहेत. यामुळे कोथिंबीरच्या दरात काहीशी नरमाई आली आहे.
Fruit Market Rate
Fruit Market Rateagrowon
Published on
Updated on

kolhapur market : गणेशोत्सवानंतर भाजीपाला बाजारात काहीशी चढउतार पहायला मिळत आहे. कोल्हापूर बाजार समितीत कर्नाटकातून कांद्याची मोठी आवक वाढली आहे तर सीमाभागातून कोथिंबीरचे ट्रक येत आहेत. यामुळे कोथिंबीरच्या दरात काहीशी नरमाई आली आहे तर भाज्यांची आवक वाढत असल्याने दर घसरले आहेत.

टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गणपतीमुळे तेजीत असलेल्या फुल मार्केटमध्ये शुकशुकाट पहायला मिळत असल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. पितृपक्षामुळे फुलबाजारात मंदीची झळ कायम राहण्याची शक्यता असून दसऱ्याला चांगली तेजी मिळणार आहे. फळबाजारालाही दसऱ्याची प्रतीक्षा आहे. डाळिंबाचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. पेरूची आवक वाढली आहे. तर सफरचंद १५० रुपये किलोने विक्री होत आहे.

अंडी दरात वाढ

दीड महिन्यानंतर अंड्याच्या दरात पुन्हा कमालीची वाढ झाली. प्रतिशेकडा ३५ ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. शेकड्याचा दर ५७५ रुपये, ट्रे १७५ तर प्रतिनग ६ रुपयांपर्यंत विक्री आहे.

भाजीपाला : टोमॅटो - ३० ते ४०, दोडका - ६० ते ७०, वांगी - ८० ते १००, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची - ३० ते ४०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी - २० ते ३०, बटाटा - ४० ते ५०, कांदा - ५५ ते ६०, लसूण - ३८० ते ४००, आले - १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ७०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बिन्स - ५० ते ६०, गवार - १०० ते १२०, भेंडी - ६० ते ८०, देशी काकडी - ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ३० ते ४०, कोथिंबीर २० ते २५, मेथी २५ ते ३०, अन्य भाज्या - १५ ते २० पेंढी, शेवगा - ५ ते ७ रुपये नग.

Fruit Market Rate
Survey Railway Line Kolhapur : शक्तिपीठ महामार्गानंतर कोल्हापुरातून दुसऱ्या एका मार्गाचे सर्वेक्षण, शेतकऱ्यांचा विरोध

फुले : झेंडू - ५० ते ६०, निशिगंध - ८० ते १००, गुलाब - १५०, गलांडा - ८० ते १००, शेवंती - ८० ते १२०, आष्टर - १२० ते १५०.

फळे : सफरचंद - २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - ८० ते १००, डाळिंब - ३०० ते ४००, चिकू - १०० ते १२०, पेरू - ५० ते ८०, खजूर - १५० ते २००, पपई - ६० ते १००, मोर आवळा - १२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज - ४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १०० ते १२० डझन, किवी - १६० ड्रॅगन - १५० ते २००, चिंच - १०० ते १४०, अननस - ४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - १४० ते १४५, शेंगतेल - १९२ ते १९८, सोयाबीन - १४० ते १४५, पामतेल - १३५ ते १४०, सूर्यफूल - १४० ते १४५.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी - २८ ते ३५, बार्शी शाळू - ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ९५ ते ९७, तूरडाळ - १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा - ९०, मूग - १०० ते ११०, मटकी - १०५ ते ११५, मसूर - ७० ते ७५, फुटाणाडाळ - ११० ते १५५, चवळी - १०० ते १३०, हिरवा वाटाणा - १७५, छोला - १२० ते १५०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com