Onion Rate : साताऱ्यात कांद्याला ५ हजारांचा दर; शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदा

Onion Price : या कारणाने कांद्याच्या दराने उसळी घेतली. क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपये वाढले. सातारा बाजार समितीत तर कांद्याचा भाव तेजीत आहे.
onion rate
Onion RateAgrowon
Published on
Updated on

Central Govrnment Onion Rate : मागच्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्याने कांदा दरात काहीशी सुधारणा पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये ५०० रुपयांनी सुधारणा दिसून येत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदा कमी असल्याने शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. काही व्यापाऱ्यांनी जुना कांदा साठवून ठेवल्याने हा दर घेत आहेत.

सातारा जिल्ह्यातील काही भागात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागच्या वर्षभरात केंद्राच्या धोरणामुळे कांद्याला दर पडले होते. याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. त्यातच शेतकऱ्यांकडूनही कांद्याचे दर वाढण्याची मागणी होत होती. त्यामुळे मागील आठवड्यात केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केले आहे.

सध्या क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी सुधारले आहेत. सातारा बाजार समितीत तर कांद्याच्या भावाला आधार मिळाला आहे. सध्या कांद्याला क्विंटलला दोन हजारांपासून दर येत मिळत आहे.

onion rate
Satara Lumpy Outbreak : सातारा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव, २५० जनावरांना लागण, २ जनावरे दगावली

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले की, केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यामुळे दरात सुधारणा दिसत आहे. पण, याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच नाही. कारण, अजून कांदा आवकेचा हंगाम दीड महिन्यांनी सुरू होईल.

वाटाण्याला क्विंटलला १५ हजार दर

सातारा बाजार समितीत वांग्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत दर येत आहे. टोमॅटोला अडीच हजार, फ्लॉवर पाच हजार, कारल्याला चार तर बटाट्यालाही तीन हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर शेवग्याला पाच हजार, पावटा आणि गवारला सहा हजारांपर्यंत दर येत आहे. वाटाण्याला क्विंटलला १५ हजारांपर्यंत दर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com