Orange Tree Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Orchard Deals: संत्रा बागांचे सौदे चढ्या दराने

Market Update: संत्रा बागांमध्ये मृगबहार अपेक्षेप्रमाणे न आल्याने पुढील काळात चांगले दर मिळू शकतात. ही बाब लक्षात घेत आतापासूनच बागांचे सौदे भरीव दराने होऊ लागले आहेत.

 गोपाल हागे

Akola News: संत्रा बागांमध्ये मृगबहार अपेक्षेप्रमाणे न आल्याने पुढील काळात चांगले दर मिळू शकतात. ही बाब लक्षात घेत आतापासूनच बागांचे सौदे भरीव दराने होऊ लागले आहेत. खरेदीदार दररोज बागांची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत सौदा चिठ्ठी करून घेत आहेत.

पूर्वमोसमी पावसामुळे यंदा संत्रा बागांचा ताण तुटला होता. यातून वाचलेल्या काही बागा फुटल्या. यंदा तुलनेने ५० टक्केच बहर दिसून येत आहे. बागांमध्ये फळांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, याच घटलेल्या उत्पादनामुळे बाजारात संत्र्याला अधिक मागणी असून, सौद्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. व्यापारी आणि निर्यातदार बागा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पुढे सरसावले असून, अनेक ठिकाणी क्रेट किंवा टन या दराने समाधानकारक भाव देण्यात येत आहे.

अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांतील बागांमध्ये यावर्षी फळधारणेचा टक्का खूपच कमी असल्याचे उत्पादक सांगत आहेत. पारंपरिक पद्धतीने मृगबहार घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी फळे दिसून येत आहेत. मात्र, त्यामुळे दरात चांगली वाढ झाल्याचे चित्र दिसत असून, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सौदे करीत आहेत.

काही ठिकाणी २२ ते २५ वजनाच्या एका क्रेटला ९०० रुपयांपर्यंत (प्रति किलोला ४० ते ४५ रुपये) व्यापाऱ्यांनी दर निश्चित केला आहे. तर काही शेतकऱ्यांनी टनांप्रमाणे सौदा केला. भोसा (ता. मेहकर) यांनी संत्रा उत्पादक प्रभाकर खुरद व त्यांच्या भावांनी तब्बल ५१ हजार रुपये प्रतिटन इतक्या दराने सौदा केला आहे. आजवर उच्चांकी दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची जवळपास २० ते २२ एकरांतील मिळून बाग आलेली आहे. तर १४०० झाडांवर बहर फुटू शकलेला नाही. या भागातील ५० टक्क्यांवर बागांमध्ये मृग बहर फुटलेलाच नाही. अशीच स्थिती रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, वाशीम, संग्रामपूर, जळगाव जामोद, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आदी तालुक्यांतील उत्पादकांचीही झालेली आहे.

येत्या काळातील मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित राहणार असल्याने दर चांगले मिळत आहेत. बागांचा दर्जा चांगला असेल तर व्यापारी स्वत:हून पुढाकार घेत आहेत. दरम्यान, बाजारातील हा सकारात्मक कल संत्रा उत्पादकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

यंदा ५० टक्के बागा बहरल्या नाहीच. त्यामुळे मृग बहरातील संत्र्याला आगामी काळात चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. आता बागांमध्ये फुलोऱ्यानंतर सेटिंगची स्थिती सुरू आहे. आम्ही २० एकरांतील बागेचा सौदा केला आहे. ५१ हजार रुपये टन दराने हा व्यवहार निश्चित केला आहे. फेब्रुवारीमध्ये फळ तोडणी केली जाईल.
प्रभाकर खुरद, संत्रा उत्पादक, भोसा, ता. मेहकर, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT