Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon

Orange Crop Insurance : संत्रा पीकविम्याचे पोर्टल शेवटच्या दिवसापर्यंत ठप्प

Orange Crop Insurance : गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनियमितता, अतिवृष्टी, गारपीट व कीड, रोगांमुळे संत्रा उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Published on

Akola News : संत्रा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मृग बहर हंगाम २०२५ साठीची फळ पीकविमा काढण्याची अंतिम मुदत शनिवारी (ता. १४) असून शुक्रवारी दुपारपर्यंत पोर्टल बंद होते. त्यामुळे हजारो संत्रा उत्पादक शेतकरी विमा संरक्षण मिळवण्यापासून वंचित राहणार आहेत.

दरम्यान मुदतीच्या एक दिवस आधी शुक्रवारी दुपारी सुरू झाली वेबसाइट सुरू झाली. मात्र, यंदाही पोर्टल वेळेवर सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : नांदेडला फळपीक विमा योजना राबवविणार

गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनियमितता, अतिवृष्टी, गारपीट व कीड, रोगांमुळे संत्रा उत्पादनात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पीकविमा ही एकमेव सुरक्षितता शेतकऱ्यांना उपलब्ध असते.

Fruit Crop Insurance
Banana Crop Insurance : सहा हजार शेतकऱ्यांना केळी पीकविमा ओळख क्रमांक

त्यामुळे मृग बहर संत्रा हंगामासाठी विमा योजना कार्यान्वित होणे अत्यावश्यक आहे. राज्य शासनाकडून संत्रा विमा योजना राबवली जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आवश्यक आहे. मात्र, पीकविमा पोर्टल वेळेत सुरू न झाल्याने नोंदणी करता आलेली नाही.

अनेकांनी बँकांमध्ये व सेवा सुविधा केंद्रांमध्ये चौकशी केली. परंतु शासनस्तरावरूच पोर्टल सुरू नसल्याने अडथळा आलेला आहे. बहुतांश शेतकरी मृग बहर धरतात. त्यांना या विम्याच्या पाठबळाची मोठी मदत होत असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com