Orange Orchard Crisis: संत्र्याचा मृग बहर वाशीममध्ये संकटात

Heatwave Impact: वाशीम जिल्ह्यात सध्या संत्रा बागांमध्ये मृग बहरास सुरुवात झाली असली, तरी वाढत्या उष्णतेमुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. या संकटामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत.
Orange Orchard
Orange OrchardAgrowon
Published on
Updated on

Washim News: वाशीम जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये सध्या मृग बहराने फूट घेण्यास सुरुवात केली असली, तरी हवामानातील अस्थिरतेमुळे बागायतदार शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे झाडांवरील ताण काहीसा कमी झाला होता.

बहर फुटण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली असून जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या तीव्र उन्हामुळे संत्रा झाडांवर आलेली फुले मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत. यामुळे संत्रा उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Orange Orchard
Citrus Estate : वसंतदादा इन्स्ट्यिूटच्या धर्तीवर ‘सिट्रस इस्टेट’चे हवे कार्यान्वयन

संत्रा बागा फुलोऱ्यात असताना उष्णतेचा झटका बसल्याने परागीभवनात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे फळधारणेचे प्रमाण घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बहाराच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन सुरू केले असून काही ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जात आहे.

Orange Orchard
Citrus Crop Disease: लिंबूवर्गीय फळ पिकांवरील कोळी

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत संत्रा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. संत्रा हे जिल्ह्याचे महत्त्वाचे नगदी पीक बनलेले असून त्यावर अनेक शेतकऱ्यांचा उपजीविका अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जर हा मृग बहर पूर्णपणे यशस्वी झाला नाही, तर यावर्षी संत्रा उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे.

सध्याच्या संवेदनशील काळात ओलित व्यवस्थापन सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान आणि दुपारी चार वाजेच्या दरम्यान तुषार सिंचन किंवा रेन पाइपद्वारे ३० मिनिटे करावे. जेणेकरून वातावरणाची आर्द्रता वाढवून तापमान काही अंशी कमी होऊ शकते. सध्याच्या वातावरणामुळे सिट्रस सीला या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी.
निवृत्ती पाटील, फलोत्पादन तज्ज्ञ, केव्हीके, करडा वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com