Orange Farming: दोन भावंडांनी जपला संत्रा फळांचा दर्जा

Orange Success Story: वरुड तालुक्‍यातील पुसला गावात दोन भावंडांनी शास्त्रोक्‍त शिफारसींचा अवलंब करीत संत्रा उत्पादनात आघाडी घेतली आहे.
Orange Farming
Orange FarmingAgrowon
Published on
Updated on

Amravati News: सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेल्या भागात उत्पादित संत्र्यांचा दर्जा आणि चव वेगळी असते. त्यामागे येथील भौगोलीकस्थिती हे मुख्य कारण आहे. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी हा भाग संत्रा उत्पादनात आघाडीवर असून याला विदर्भाचा कॅलिफोर्निया असेही म्हणतात. याच वरुड तालुक्‍यातील पुसला गावात दोन भावंडांनी शास्त्रोक्‍त शिफारसींचा अवलंब करीत संत्रा उत्पादनात आघाडी घेतली आहे.

उच्चशिक्षित भावंडांची शेती

मांडळे कुटुंबातील पंकज व स्वप्नील या भावंडांच्या माध्यमातून शेतीचे व्यवस्थापन होते. यातील स्वप्नील यांचे शिक्षण बी.ए.बी.एड. कृषी पदविका, कृषी पदवी असे झाले आहे. परंतु शेतीची ओढ असल्याने त्यांनी नोकरीचा नाद सोडत शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील (कै.) श्रीरामपंत मोतीरामजी मांडळे हे शिक्षक होते.

Orange Farming
Citrus Farming : नियोजन लिंबूवर्गीय फळबागेतील आंबिया बहराचे

आई सुषमा श्रीरामपंत मांडळे या देखील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापिका होत्या. या भावंडाच्या बागेत १५, १२ आणि सात वर्षे अशा वयाची झाडे आहेत. बागेला पाणी देण्याकरिता वाफे आणि ठिबक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला आहे.

वाफे पद्धतीने पाणी देताना ते झाडाच्या बुंध्याला लागणार नाही याची खबरदारी घेतली जाते. त्याकरिता झाडाभोवती रिंगण (गोंगोली) करण्यात आले आहे. बोर्डोपेस्ट झाडाला लावली जाते. या माध्यमातून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखणे तसेच खोडकिड्यांचे नियंत्रण होते.

Orange Farming
Soybean Disease : सोयाबीनवरील बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण

शास्त्रोक्‍त व्यवस्थापन

आंबिया आणि मृग असे दोन्ही बहर घेतले जातात. त्याकरिता शास्त्रोक्‍त पद्धतीने नियोजन होते. २०२३-२४ या वर्षातील हंगामात मृग बहरातील संत्र्याला ४० हजार रुपये प्रतिटन असा विक्रमी दर मिळाला. त्या माध्यमातून २२ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. सहा एकरासाठी पाच लाख रुपयांचा खर्च होतो.

२०२४-२५ मध्ये बांगलादेशकडून आयात शुल्कात झालेली वाढ त्याबरोबरच राजस्थानच्या संत्र्यांची झालेली आवक यामुळे दर दबावात आहेत. ३० हजार रुपये टन असा दर मृग बहरातील संत्र्याला मिळाला, असे स्वप्नील मांडळे यांनी सांगितले.

मृग बहराची फळे घेतल्यास बागेचा दर्जा खालावतो असा समज आहे. परंतु खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास बाग निरोगी राहते, असा विश्‍वास रुजविण्यात ही भावंडे यशस्वी ठरली आहेत.

स्वप्नील मांडळे, ९४२१८२४४४२८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com