Maharashtra Forts: खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने वढू-तुळापूर येथे गड-किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम उत्साहात पार पडली. राज्यभरातील शिवप्रेमींनी श्रमदानातून ऐतिहासिक परिसराची स्वच्छता करत स्वराज्याच्या वारसा जतनाची शपथ घेतली. .धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ परिसरात आयोजित या मोहिमेत युवकांनी कचरा संकलन करून झाडे-झुडपे हटविली. ऐतिहासिक वास्तूंची निगा राखण्यासोबतच येथे विविध स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..Fort Conservation: गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी संसदेत आवाज उठवणार : लंके.मोहिमेदरम्यान घेतलेल्या शिवव्याख्यानात इतिहास अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर प्रकाश टाकला. .Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी.सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड आणि नाशिक या भागांतून आलेल्या मावळ्यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. इतिहास आणि पर्यावरण रक्षणाची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..गड-किल्ले केवळ दगड-मातीच्या रचना नसून स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. गड-किल्ल्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. छत्रपतींचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी आणि इतिहासाचे जतन करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.- नीलेश लंके, खासदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.