Onion  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Transportation : लासलगावहून रेल्वेने कांदा दिल्लीला रवाना

Onion Market Update : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यापैकी शनिवारी (ता. १६) रेल्वेच्या माध्यमातून ८४० टन कांदा किशनगंज नवी दिल्ली येथे पाठविण्यात आला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : कांद्याची उपलब्धता कमी असल्याने शहरातील किरकोळ कांदा विक्री दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा बाजारात सुरू आहे.

त्या अनुषंगाने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यापैकी शनिवारी (ता. १६) रेल्वेच्या माध्यमातून ८४० टन कांदा किशनगंज नवी दिल्ली येथे पाठविण्यात आला आहे.

लासलगाव येथील नाफेड व एनसीसीएफच्या गोदामातून आतापर्यंत दिल्लीसाठी २५२० टन कांदा पाठवण्यात आला आहे. ८४० टन कांदा चेन्नई येथील कोरूकिपिटू येथे पाठवत कांद्याच्या वाढलेल्या भावातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

किरकोळ दरात कांद्याने ८० रुपये प्रति किलोचा टप्पा पार होताच गेल्या आठवड्यात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला गेल्याने कांदा दरात एक हजार रुपयाची घसरण झाल्याचे दिसले.

उन्हाळा कांद्याची आवक कमी झाल्याने काही आठवड्यात कांदा भावात तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी १६०० जास्तीत जास्त ४९०० सरासरी ४५००, तर उन्हाळ कांद्याला बाजारभाव कमीत कमी २९०० जास्तीत जास्त ४९०५, तर सरासरी ४७०० भाव मिळाला. याशिवाय कांदा बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आसाम रस्ते मार्गाने कांदा जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT