Onion Rate : कांदा दरात घसरण तर भाजी पाल्यांची आवक घटली; कोल्हापूर बाजारात नेमकी काय स्थिती

Vegetables Rate : किरकोळ बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळू लागला आहे. तुळशी विवाहानिमित्त बाजारात आवळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.
Onion Rate kolhapur
Onion Rate kolhapuragrowon
Published on
Updated on

Vegetables Rate Kolhapur : कोल्हापूरच्या कांदा बाजारपेठेत सध्‍या सोलापूर ग्रामीण, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट भागांतून नवा कांदा येत आहे. तर दौंड पाटस, अहमदनगर, पुणे ग्रामीण भागांतून जुना कांदा येत आहे. याचबरोबर कर्नाटकमधूनही कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत कांदा आवक वाढल्याने क्विंटलला दर २०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. यात व्दितीय, तृतीय श्रेणीचा कांदाही ३ हजार ते ४ हजार रुपये क्विंटल असा सुरू आहे.

कोल्हापूर बाजारात शाहू मार्केट यार्ड येथील बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्यांना चांगला दर मिळू लागला आहे. ढब्बू मिरची, काकडी, वांगी, वरणा, गवार, दोडका, बिन्स, भेंडी, उसावरील शेंगा, लिंबू आदी फळभाज्यांचे दरात तेजी आली आहे. तुळशी विवाहानिमित्त बाजारात आवळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.

दिवाळी आणि भाजीपाल्याचा शेवटचा तोडा यामुळे बाजारात भाजीपाल्यासह फळभाज्यांचीही आवक कमी झाली आहे. वांगी, दोडका, भेंडीची आवक बरी आहे. नवीन भाजीपाल्याची आवक होण्यासाठी महिना-दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाला आवक कमीच राहील, असा अंदाज काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवला.

फळभाज्यांचे किलोचे दर रूपयांत असे

गवार ८० ते १२०, ढब्बू मिरची १२०, काकडी, साधी १०० ते १२०, काकडी काटेरी ५० ते ६०, वरणा १०० ते १२०, उसावरील शेंगा ७० ते ८०, दोडका ६०, भेंडी ५०, कारली ६०, बिन्स ८०, दुधी भोपळा २० ते ४०, प्रतिनगास, पडवळ १२० ते १३५, गाजर ६०, वांगी १२० ते १४०, मका कणीस (स्वीट कॉर्न) १०, शेवगा शेंग २० ते ३५, आले ८० ते १२०, मुळा १० रूपये नग, कांदा ३० ते ६९ रुपये किलो, बटाटा ४५ ते ५५, लसूण ३२० ते ३५०, राय आवळा १६० रूपये किलो.

पालेभाज्यांचे दर असे रूपयांत

मेथी ३० रूपये प्रति पेंडी, कांदा पात २५, शेपू २५, अंबाडा १०, घोळीची भाजी वाटा १०, कोथिंबीर २० ते ३०, पालक १० ते १५, चाकवत २० रूपये पेंडी.

Onion Rate kolhapur
Kolhapur Politics : मुश्रीफांनी गडहिंग्लज साखर कारखाना बंद पाडला, समरजीत घाटगे गटाकडून आरोप

राय आवळ्याची आवक वाढली

नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत राय आवळ्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात होते. विशेषतः दिवाळीत लक्ष्मीपूजन आणि तुलसी विवाहादरम्यान पूजेमध्ये राय आवळा पूजासाहित्यात ठेवला जातो. त्यामुळे याआधी हे पीक अशाच सणानिमित्त मोठ्या प्रमाणात बाजारात येत होते. मात्र बारमाही या आवळ्याला आरोग्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे डायट पाहणारी आणि आरोग्याला महत्त्व देणारी मंडळी हा आवळा खरेदी करण्यासाठी गर्दी करीत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com