Late Kharif Onion : खानदेशात लेट खरीप कांदा पीक जोमात

Kharif Onion : धुळे : खानदेशात खरिपातील लेट किंवा उशिराची कांदालागवड ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाली आहे. पीक सध्या जोमात आहे. त्यात पुढील महिन्याच्या अखेरीस काढणी होईल, अशी स्थिती आहे.
Onion Cultivation
Onion Cultivation Agrowon
Published on
Updated on

Dhule News : धुळे : खानदेशात खरिपातील लेट किंवा उशिराची कांदालागवड ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाली आहे. पीक सध्या जोमात आहे. त्यात पुढील महिन्याच्या अखेरीस काढणी होईल, अशी स्थिती आहे. ऑगस्टमध्येच शेतकरी कांदा लागवडीची तयारी करीत होते.

त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या होत्या. मध्यंतरी कांदा बियाणे दरवाढ सुरूच राहिली किंवा बियाणे अधिक दरात शेतकऱ्यांना घ्यावे लागेल, अशी स्थिती होती. परंतु पावसाने कांदा लागवडीबाबत नियोजन सतत बदलले. काहींची लागवड कमी झाली. कारण रोपे पावसात खराब झाली. तर काहींनी लागवड टाळली व लेट खरिपात लागवड केली.

Onion Cultivation
NAFED Onion : ‘नाफेड’ची लेट खरीप कांदा खरेदी रखडली

ऑगस्टमध्ये पावसाने अनेकांनी रोपवाटिका तयार करणे टाळले. उशिराच्या लागवडीसाठी रोपवाटिकांमधील रोपे तगण्याची स्थिती चांगली किंवा समाधानकारक होती. काही भागात या रोपवाटिका जोमात होत्या. सततच्या पावसाने कांदा बियाणे बाजारातील तेजीही कमी झाली होती. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दर्जेदार बियाण्याची विक्री करीत असल्याने त्याचा लाभ कांदा उत्पादकांना बियाणे खरेदीसंबधी झाला.

अनेक शेतकरी लेट खरीप कांदा पिकाकडे वळत असल्याची स्थिती होती. पुढे लागवडही वाढली आहे. जूनच्या सुरुवातीला प्रतिकूल वातावरण होते. यात बियाण्यांची उगवण व्यवस्थित होईल की नाही, अशी भीतीही होती. परंतु शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून रोपवाटिकांमध्ये बियाण्यांची उगवणक्षमता टिकविली. पण पावसाने त्यातही नुकसान झाले. यामुळे लेट खरीप कांदा लागवडीवर भर देण्यात आला. त्याची लागवड सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झाली. लागवड सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com