Cotton Rate
Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापसाचे पुढचे वायदे का नाही आले?

अनिल जाधव

पुणेः देशातील कापूस दरात (Cotton Rate) सध्या चढ उतार सुरु आहेत. मात्र कापूस एका भावपातळीवर स्थिर आहे. बाजारातील कापूस आवकही (Cotton Arrival) घटलेली आहे. तर दुसरीकडे कापसाचे जानेवारीचे वायदे (Cotton Futures) अद्यापही खुले करण्यात आलेले नाहीत.

मागील हंगामात कापूस दर विक्रमी पातळीवर पोचले होते. त्यामुळे कापूस वायद्यांमध्ये सट्टेबाजी होते आणि एकाच घटकाची पकड आहे, असा आरोप कापड उद्योगाने केला होता. त्यामुळे कापूस वायद्यांच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सेबी आणि एससीएक्सने घेतला होता. म्हणून जानेवारी २०२३ पासून पुढचे वायदे खुले करण्यात आले नव्हते. जानेवारीचे वायदे तात्पुरते थांबविण्यात आले होते.

पण वायदे थांबवून आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही याबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. डिसेंबरच्या वायद्यांमध्येच सध्या व्यवहार सुरु आहेत. वायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्या त्या महिन्यातील दराचा एक अंदाज येत असतो. मात्र पुढचे वायदे खुले झाले नसल्याने शेतकऱ्यांनाही पुढील काळात कापसाचे दर काय राहू शकतात? याचा अंदाज येत नाही.

सध्या नोव्हेंबरच्या तुलनेत कापसाचे दरही नरमले आहेत. कापूस दरात चढ उतारही सुरु आहेत. या परिस्थितीत कापसाचे वायदे सुरु करण्याची मागणी केली जात आहे. मात्र वायद्यांच्या अटी आणि शर्ती बदलण्याचे काम अद्यापही सुरुच असल्याचे, एमसीएक्सकडून सांगण्यात आले. तसेच कापसाच्या वायद्यांवर बंदी घालण्याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचेही स्पष्ट केले.

उत्पादन घटीचा अंदाज

उद्योगांनी यंदा देशातील कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी वाढून ३४४ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मात्र शेतकरी यंदाही कापूस उत्पादन घटल्याचे सांगत आहेत. तसेच मागील हंगामातील शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे यंदा देशातील कापूस पुरवठा मागणीऐवढाच असेल, असे कापूस बाजारातील अभ्यासक सांगत आहेत. त्यामुळे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत. मागील महिन्यात कापसाने उच्चांकी ९० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. त्यानंतर दरात घसरण होत गेली. नोव्हेंबरच्या शेवटी कापूस दर ८० सेंटपर्यंत नरमले होते. मात्र डिसेंबरमध्ये चीनमधून बाजाराला प्रेरणा देणारी बातमी आली.

चीनच्या नागरिकांनी सरकारच्या कोरोना धरणाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. निदर्शने झाली. त्यामुळे काही शहरांमधील निर्बंध शिथिल केले. याचा सकारात्मक परिणाम कापूस बाजारावर झाला. कापूस दरपातळी वाढली. मात्र दरात चढ उतार कायम राहीले. आज कापसाला ८४ सेंट प्रतिपाऊंडचा दर मिळाला.

देशातील दरपातळी

देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. मात्र सध्या कापूस बाजारात चढ उतार असले तरी शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT