Cotton Rate : कापूस घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक

कापूस पिकात बोंडे उमलण्यास सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतिपावसात कापसाचे नुकसान झाले. परंतु अशा स्थितीतही शेतातला कापूस घरात आणण्याची धावपळ करीत आहेत.
Cotton Harvesting
Cotton Harvesting Agrowon

वर्धा : कापूस पिकात (Cotton Crop) बोंडे उमलण्यास सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतिपावसात कापसाचे नुकसान (Cotton Crop Damage) झाले. परंतु अशा स्थितीतही शेतातला कापूस घरात आणण्याची धावपळ करीत आहेत. त्यासाठी मजुरीदेखील अधिकची द्यावी लागत आहे. कापूस वेचणी (Cotton Picking) दहा रुपये प्रतिकिलो आहे. तर सात तास कामासाठी १५० ते २०० रुपये रोज अशी मजुरीदेखील लागत आहे. तरीही मजूर उपलब्ध होत नसल्याने ‘पाढरं सोनं’ घरी आणण्यास शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

Cotton Harvesting
Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

उष्णता अधिक असल्याने बोंडे अधिक गतीने उमलत आहेत. त्यातच पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण अधिक असल्याने एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांची गरज निर्माण झाली. मागील कापूस हंगामापासून वेचणीसाठी सरसकट सर्व शेतकऱ्यांना दहा रुपये प्रतिकिलो प्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे.

Cotton Harvesting
Cotton Rate : कापूस दर सुधारण्याचा अंदाज

चांगला भाव मिळण्यासाठी वेळीच वेचणी होऊन कापूस घरी आणने गरजेचे असल्याने शेतकरी आटापीटा करीत आहेत. मजूर मिळत नसल्याने बाहेरगीवी जात वाहणांनी मजूर शेतात आणावे लागतात. जास्तीची मजूरी द्यावी लागत असल्याने खर्चात भरमसाठ वाढ होत आहे.

प्रतिकिलोस १० रुपये आणि मजुरांचा वाहतुकीचा खर्च गृहीत धरला तर प्रति किलोला १२ ते १३ रुपये खर्च येतो. रासायनिक खते, कीटकनाशकांची फवारणी, बियाण्याचा खर्च असा सर्व खर्च समाविष्ट केला तर तो भरमसाठ आहे. म्हणूनच कधीकाळी कापसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या गावांमध्ये आता या पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे.

किलोप्रमाणे होते दुप्पट काम

शेती कामासाठी रोजणदारीत आठ तासांची मजूरी दीडशे ते दोनशे रुपये आहे. मात्र एक मजूर एका दिवसात पंधरा ते वीस किलोंपेक्षा जास्त कापूस वेचत नाही. तोच कापूस किलोप्रमाणे दिला तर तितक्याच वेळात एक मजूर ४० ते ५० किलो कापूस वेचतो. त्यामुळे शेतकरी किलोप्रमाणे कापूस वेचणीला देत आहेत.

वर्षभर शेतात मजूरी करतो. मात्र महागाईच्या तुलनेत कामाचा मोबदला मिळत नाही. रोजनदारीने कापूस वेचणी केली तर कमी भरतो हे खरे आहे. मात्र दोन पैसे जास्त येतील या आशेने आम्ही भुक-तहान विसरुन काम करतो.

- जयश्री फुलझेले, शेतमजूर, पवनार.

वेळेवर मजूर मिळाले तर बरे नाहीतर शेतमालाचे मोठ नुकसान होते. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो त्यामुळे दोन पैसे जास्त गेले तरी चालते, पण वेचणी वेळेत होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मिळाले तितके मजूर आणून काम करुन घ्यावे लागते.

- पुरुषोत्तम तिघरे, कापूस उत्पादक, पवनार.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com