Cotton Rate : कापसाचे दर वाढण्याची शक्यता

Team Agrowon

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Cotton Rate | Agrowon

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला.

Cotton Rate | Agrowon

त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी मंदावली होती. परंतु  सरकारच्या निर्बंधांविरोधात चीनमधील जनता रस्त्यावर उतरली.

Cotton Rate | Agrowon

अनेक ठिकाणी निदर्शने झाल्यानंतर चीन सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. नागरिकांमधील वाढत्या रोषामुळे ग्वांगझू आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत.

Cotton Rate | Agrowon

चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध शिथिल  करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.

Cotton Rate | Agrowon

त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापसाला उठाव मिळू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये वाढण्याची शक्यता आहे.

Cotton Rate | Agrowon

शेतकऱ्यांनी बाजारातील भावपातळीवर नजर ठेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विकावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. 

Cotton Rate | Agrowon
cta image | Agrowon
क्लिक करा