Cotton Agriculture
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

देशात दोन वर्षांत नवे कापूस वाण किंवा बियाणे तंत्रज्ञान येणार आहे. या बाबत देशातील कापूस प्रकिया उद्योजक, शेतकऱ्यांनी मध्यंतरी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग मंत्र्यांशी भेट घेतली होती.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

जळगाव ः ‘‘देशात दोन वर्षांत नवे कापूस वाण (New Cotton Verity) किंवा बियाणे तंत्रज्ञान (Cotton Seed Technology) येणार आहे. या बाबत देशातील कापूस प्रकिया उद्योजक (Cotton Processor Industry), शेतकऱ्यांनी मध्यंतरी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग मंत्र्यांशी भेट घेतली होती. त्यात केंद्र सरकार या नवीन बियाणे तंत्रज्ञानाबाबत (Seed Technology) अनुकूल आहे,’’ असा विश्वास महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल (Bhupendrasingh Rajpal) यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना व्यक्त केला.

राजपाल यांच्याशी जळगावात आयोजित कापूस व्यापार बैठकीनिमित्त खास बातचीत केली. त्या वेळी श्री. राजपाल म्हणाले, ‘‘देशात यापूर्वीच कापूस बियाण्यातील नवे तंत्रज्ञान यायला हवे होते. देशात कापूस उत्पादकता वाढायला हवी. यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ होईल व कापूस उद्योगातील साखळीलादेखील ही बाब पूरक ठरेल. नवीन वाणासंबंधी देशातील जिनिंग प्रेसिंग उद्योजक, वस्त्रोद्योगातील मंडळी, शेतकरी आदींनी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर व वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.

त्यात मंत्र्यांनी कापसाच्या वाणांत सुधारणा, संशोधन सुरू केल्याची माहिती दिली. हे वाण जनुकीय सुधारित असेल. त्यामुळे कापूस उत्पादन अधिक येईल. तसेच या वाणावर रोगराई किंवा किडींचा प्रकोपही नसेल. यामुळे शेतकऱ्यांचा किडनाशकांवरील उत्पादन खर्च कमी होईल. तसेच उत्पादन व उत्पन्न वाढू शकेल. देशात सध्या जे कापसाचे उत्पादन येत आहे, त्यापेक्षा ३० ते ४० टक्के अधिकचे उत्पादन नव्या कापूस वाणामुळे मिळू शकेल.’’

‘‘अमेरिका व इतर देशांत एक वेचणीचे वाण आहेत. एकाच वेळी वेचणी केल्यानंतर तेथील कापूस पिकात नव्याने वेचणी केली जात नाही. तेथे वेचणी यंत्राद्वारे केली जाते. परंतु देशात येणारे नवे कापूस वाण एक वेचणीचा नसेल. या वाणात एकापेक्षा अधिक वेळेस वेचणी करता येईल. आपल्याकडेही एक वेचणी वाण येईल, अशी अपेक्षा होती.

कारण कापसावर वेचणीचा खर्च अधिक आहे. हा खर्च कमी होईल, असे वाटत होते. परंतु आपल्याकडे एकापेक्षा अधिक वेळेस वेचणीचे वाण येणार आहे. सध्या देशात प्रचलित वाणात हेक्टरी ५० हजारपर्यंत झाडे असतात. परंतु नव्या वाणात हेक्टरी एक लाखांपर्यंत झाडांची संख्या वाढविता येईल. यातून अधिकचे उत्पादन मिळेल,’’ अशीही अपेक्षा राजपाल यांनी व्यक्त केली.

‘कापूस स्वच्छतेकडे लक्ष द्या’

‘‘देशातील कापसाचा दर्जा चांगला आहे. परंतु कापसात काडीकचरा अधिक येतो. कापसावर बसणे, त्यावर झोपणे, प्लॅस्टिकच्या गोण्यांत कापूस आणणे, शेतात वेचताना कापसात येणारा कचरा दूर न करणे आदी कारणांमुळे कापसात कचरा येतो. यामुळे कापसाचा दर्जा घसरतो. हा दर्जा सुधारताना कारखानदारांनाही अडचणीचे ठरते. परिणामी शेतकऱ्यांना कमी दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचा दर्जा कसा चांगला, राहील यावर काम करावे. कापूस वेचणी करताना सुताच्या पिशव्या किंवा गोण्यांत आणावा, त्यात प्लॅस्टिकचा कोणताही कचरा जाणार नाही, याची खबरदारी शेतातच घ्यावी,’’ असे राजपाल म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT