Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांवर बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाशी तब्बल दोन तासाच्या चर्चेचेनंतर राज्य सरकारने ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या विळाख्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेली समिती सहा महिने अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणार आहे. .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी (ता.३०) बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. "राज्य सरकारने मित्राचे चेअरमन प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. या समितीने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामकाज पूर्ण करावे. तसेच राज्य सरकारला कर्जमाफीचा अहवाल द्यावा. या अहवालानुसार तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. सगळ्या नेत्यांशी आमची अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी देखील यासाठी मान्यता दिली आहे." असेही मुख्यमंत्री म्हणाले..Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर.बैठक झाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "बैठक सकारात्मक झाली असून आम्हाला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात तारीख हवी होती. त्याबद्दल राज्य सरकारने आम्हाला तशी तारीख दिली आहे. ३० जून २०२६ पर्यंत समिती आपला निर्णय देईल. त्यानंतर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येईल. आता आंदोलनाची गरज नाही. तात्पुरते आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत." असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले..Bacchu Kadu: लोकन्यायालयाचा निर्णय मानणार: बच्चू कडू.या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर बच्चू कडू यांच्यासह अजित नवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर उपस्थित होते. राज्य सरकारने बैठकीची वेळ संध्याकाळी सात वाजताची ठरवली होती. परंतु या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची एक स्वतंत्र दीड तास बैठक घेतली. त्यामुळे शेतकरी नेते प्रतिक्षा करत राहिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांना बैठकीसाठी पाचारण केले..बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबरपासून नागपूर येथे महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनानंतर राज्य सरकारने नागपूरला शिष्टमंडळ पाठवून बच्चू कडू यांना चर्चेचे निमंत्रण दिले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना कर्जमाफीची तारीख आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईला पाचारण केले. त्यानुसार बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी गुरुवारी ४ वाजता मुंबई गाठली. सलग चार ते पाच मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेनंतर बैठकीला सुरुवात झाली. तब्बल दोन तास विविध मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी ३० जून २०२६ पर्यंतचा मुहुर्तू शोधून काढला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.