cotton rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापसाचे मुहूर्ताचे दर नऊ हजार रुपये राहणार

अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर : अमेरिकन बाजारात (Cotton Market America) घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर (Indian Market Cotton Rate) मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

कापूस व्यापार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरड्या दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, अशी चर्चा रंगली होती. अमेरिकेतही मध्यंतरी पाऊस कमी होता. त्यामुळे तिथेही कापसाची उत्पादकता कमी होईल, अशी शक्यता होती.

अमेरिकेच्या बाजारात आता मात्र कापसाचे भाव पडू लागले आहेत. गेल्या वर्षी एक पाउंड रुईचा भाव एक डॉलर ७० सेंट पर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी एक डॉलर १५ सेंट पर्यंत घसरला. त्यानंतर कमी उत्पादकतेच्या शक्यतेमुळे त्यात वाढ होत एक डॉलर ३० सेंटपर्यंत तो पोहोचला. भारताचा विचार करता पंजाब- हरियानाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे.

या कापसाला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे यंदाही कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु अचानक अमेरिकन बाजारात कापसाच्या दरात घट झाली. एक पाउंड रुईचा दर हा एक डॉलर १२ सेंट पर्यंत घसरला. त्यामुळे येत्या काळात भावातील ही पडझड आणखी होण्याची शक्यता आहे.

सरकीचे दर तीन हजार रुपये राहण्याचा अंदाज

अमेरिकन बाजारात सध्या असलेला दर कायम राहिल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी होणाऱ्या कापसाला आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल. यात सरकीचे भाव तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचे राहतील, असा अंदाज आहे. सोयाबीनमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर हे दर कमी मिळण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे एक डॉलर १२ सेंट प्रतिपाऊंड रुईचा भाव हा अमेरिकेच्या बाजारात १९९४-९५ साली होता. त्यावेळी भारतातील कापसाचे दर २५०० ते २७०० रुपये क्विंटल होते. यंदा ते ८००० रुपये राहतील, असेही जाणकारांनी सांगितले.

शेतीमालाच्या दरात होणाऱ्या घसरणीमागे रुपयाचे डॉलरच्या तुलनेत सातत्याने होणारे अवमूल्यन हे मुख्य कारण आहे. भारतीय शेतीमालाला यंदा हमीभावा इतकाच दर मिळेल. शासनाने दरातील पडझड रोखण्यासाठी आयात शुल्क पूर्ववत करण्याची गरज आहे.
विजय जावंधिया, शेती विषयाचे अभ्यासक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; परिवहनची अतिरिक्त जमीन व्यापारी तत्वावर वापरास मंजुरी

Lumpy Skin : जाफराबादेत २१ जनावरांना ‘लम्पी’ची बाधा

Agriculture Solar Pump : पैसे भरूनही सौरपंप मिळेना

Jayakwadi Dam : ‘जायकवाडी’तून गोदावरी पात्रात विसर्ग थांबविला

Krishi Seva Kendra : आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT