Leopard Alert: रांजणगावच्या औद्योगिक क्षेत्रात धडकला बिबट्या
Forest Department: रांजणगाव MIDCतील एलजी आणि फियाट कंपनीच्या परिसरात तीन बिबट्यांचा मुक्त वावर दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रात्रपाळीतील कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वनविभागाने दोन्ही ठिकाणी सहा पिंजरे लावून शोधमोहीम सुरू केली आहे.