Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?
Smart Farming: कृषी विभागाने शेतकऱ्यांना संपूर्ण शेती मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘महाविस्तार’ हे एआधारित ॲप राज्यभर सुरू केले आहे. चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून विकसित झालेले हे ॲप हवामान, पीक सल्ला, खतांचे अंदाज, कीड-रोग व्यवस्थापन आणि बाजारभाव यांसारख्या सुविधा एका ठिकाणी उपलब्ध करून देते.