Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate: केळीला कमाल २१०० रुपये दर

Khandesh Market Update: खानदेशात मागील आठ ते १० दिवसांत केळी आवकेत वाढ होत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातही केळीची आवक वाढली असून, तेथेही मंगळवारी (ता. २२) लिलावात केळीस कमाल २१०० दर मिळाला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात मागील आठ ते १० दिवसांत केळी आवकेत वाढ होत आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातही केळीची आवक वाढली असून, तेथेही मंगळवारी (ता. २२) लिलावात केळीस कमाल २१०० दर मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आगाप कांदेबाग केळी पिकात आवक वाढत आहे. कांदेबाग केळी पिकासाठी अलीकडे रावेर, मुक्ताईनगरमध्येही आगाप कांदेबाग केळी पीक वाढले आहे. श्रावण महिना, गणेशोत्सव तसेच सणांच्या दिवसात केळीची काढणी होईल,

यासाठी रावेर, मुक्ताईनगरातही केळी लागवड होऊ लागली आहे. केळी लागवड वाढत असून उठावही आहे. मागील सात ते आठ दिवसांत केळी आवक सतत वाढल्याने केळीच्या दरात सुधारणा मात्र झालेली नाही.

केळीची आवक खानदेशात जुलैच्या मध्यापर्यंत प्रतिदिन सरासरी ८० ते ९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी होती. त्या वेळी केळीची दरवाढ सुरू होती. केळीचे कमाल दर २५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. परंतु अलीकडे केळी आवक १२५ ट्रकपेक्षा अधिक होत आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगरातील केळी आवक वाढली आहे. यामुळे केळी दरवाढ थांबली आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी आवक सध्या प्रतिदिन ३३५ ट्रकपर्यंत पोहोचली आहे. तेथे आवकेत मोठी वाढ झाल्याने तेथील लिलावातही केळीला कमाल दर २१०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. खानदेशात नियमित किंवा हंगामी कांदेबाग केळी पिकात काढणी सुरू झालेली नाही. ही काढणी गणेशोत्सव किंवा पोळा सणाच्या कालावधीत सुरू होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून २७ मे पासून देशव्यापी आंदोलन

Crop Insurance Compensation Delay: नांदेडला ५२ मंडलांतील शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

Water Wastage: ऐन टंचाईत पाण्याची नासाडी

Electricity Supply Affects: जेऊर परिसरातील ऊस वाळतोय; शेतकरी संकटात

Fishing Ban: जूनआधीच होड्या किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT