Marine Conservation: शासकीय नियमांनुसार लागू होणाऱ्या मासेमारी बंदीच्या अंमलबजावणीमुळे नवी मुंबई आणि उरण परिसरातील सर्व प्रमुख बंदरांवर सध्या शुकशुकाट पसरला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यांत्रिक बोटी सुरक्षितपणे किनारपट्टीवर विसावल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील सुमारे ७,२०० मच्छीमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षितपणे नांगरून ठेवल्या आहेत..उरण तालुक्यात करंजा आणि मोरा ही प्रमुख मासेमारी बंदरे असून, येथे मोठ्या संख्येने यांत्रिक बोटी आहेत. शासनाच्या आदेशानुसार या दोन्ही बंदरांवरील बोटींचे आवागमन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, केळवणे आणि न्हावाशेवा या औद्योगिक तसेच संवेदनशील सागरी क्षेत्रांमधील यांत्रिक बोटींची मासेमारीदेखील पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. .Raigad Fishing Ban: खोल समुद्रातील मासेमारी १ जूनपासून बंद.या सर्व भागांतील ट्रॉलर्स आणि मोठ्या नौका बंदरात सुरक्षितपणे बांधून ठेवल्या आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्राचा विचार केल्यास दिवाळे, सारसोळे आणि घणसोली या प्रमुख कोळीवाड्यांमध्ये मासेमारी बोटी बंद केल्या आहेत..Fishing Ban : हवामानामुळे मासेमारीवर पुन्हा अवकळा.विशेषतः दिवाळे हे गाव नवी मुंबईतील सर्वात मोठे मासेमारी केंद्र असून, येथून खारघर, तळोजा, कामोठे आणि पनवेल या वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांना मोठ्या प्रमाणात मासळीचा पुरवठा केला जातो, परंतु, बंदीच्या काळात इंधनाची टंचाई, मासळी वाहतुकीसाठी पोलिसांच्या परवानग्यांची आवश्यकता आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमधील मर्यादा यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे..सुक्या मासळीचे भाव गगनालामासेमारी बंदीमुळे बाजारात ताज्या माशांची आवक मर्यादित झाली. परिणामी, ताज्या माशांचे भाव दुप्पट किंवा तिप्पट झाले आहेत. ताजी मासळी उपलब्ध नसल्याने पावसाळ्याच्या दोन महिन्यांसाठी सुक्या मासळीची मागणी प्रचंड वाढते. यामुळे नवी मुंबई व उरणच्या बाजारपेठेत सुक्या मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.