Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय ? कापूस, सोयाबीन , तूर, टोमॅटो यांचे काय आहेत बाजारभाव?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : देशातील बाजारात कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार सुरुच आहेत. सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दरपातळीही काही प्रमाणात कमी झाली आहे. कापसाचे भाव क्विंटलमागं अनेक ठिकाणी २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले. कापसाला आज सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात. त्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीनची भावपातळी अनेक बाजारांमध्ये आज क्विंटलमागे ५० रुपयांनी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सनीही आपले खरेदीचे भाव ४ हजार ७५० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान ठेवले होते.

तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात मोठी नरमाई आलेली दिसते. पण देशातील बाजारात सोयाबीन भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे.  वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील टोमॅटोची आवक कायम आहे. आवक चांगली असल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. पाणी टंचाईमुळे उत्पादनाला फटका बसला तरी आवकेचा दबाव दिसतो.

टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ८०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते ११०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT