Agrowon Podcast : सोयाबीन भाव टिकून, कापूस, सोयाबीन, लिंबू तसेच गहू दराचे काय आहेत भाव ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : देशातील बाजारात आजही सोयाबीनचे वाढलेले भाव कायम होते. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत नरमाई आली होती. त्यामुळ देशातील सोयाबीन बाजारातही चढ उतार दिसून येतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उचार सुरुच आहेत. तर बाजार समित्यांमधील भावपातळी कायम दिसते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र कमी होत आहे. काल कापसाची आवक ५३ हजार ६०० हजार गाठींच्या दरम्यान होती. तर बाजारभाव सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव दोन दिवसांपासून काहीसे स्थिरावले आहेत. देशातील बाजारातही कापसाचे भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापसाची आवक घटली ; पाहुयात कापूस रेट, सोयाबीन, टोमॅटो तसेच तूरीचे भाव ?

आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Soybean Market : सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम

देशातील उत्पादन घटीचा अंदाज आणि बाजारातील सरासरीपेक्षा कमी आवक, यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत. तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत. उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

वाढत्या उन्हामुळे लिंबुला चांगली मागणी आहे. पण दुसरीकडे वाढते ऊन आणि पाणीटंचाई याचा लिंबू पिकाला फटका बसला. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळेही उत्पादन कमी झाले आहे. यामुळे बाजारातील लिंबू आवक घटली. परिणामी लिंबुला चांगला भाव मिळत आहे. सध्या बाजारात लिंबुला गुणवत्तेप्रमाणे ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबुचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com