Agrowon Podcast : टोमॅटोचे भाव काहिसे नरमले

Tomato Rate : टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होत जाईल असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Tomato Market
Tomato Market Agrowon
Published on
Updated on

Agriculture Market Update : देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चांगली वाढ झाली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ४०८ डाॅलरवर कायम होते. देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची भावपातळी ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनचे भाव नरमल्याने बाजारातील आवकही काहिशी कमी झाली. सोयाबीनच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये आज चांगली सुधारणा झाली होती. आंतरराष्ट्री बाजारात कापसाचे वायदे वाढून ८२.७३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. काल दुपारच्या तुलनेत ही वाढ जवळपास तीन टक्क्यांची आहे. तर देशातील बाजारातही कालच्या तुलनेत वायदे खंडीमागे ६०० रुपयांनी वाढले होते. आज देशातील वायदे ५७ हजार ६०० रुपयांवर पोचले. बाजार समित्यांमधील भावही क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. कापसाचे बाजार समित्यांमधील भाव ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. तर रेनटच म्हणजेच भीजलेल्या कापसाचे भाव ६ हजार ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या बाजारात पुढील आठवडाभर क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tomato Market
Tomato Cultivation : नियोजनबद्ध टोमॅटो लागवडीवर भर

टोमॅटोच्या भावाता मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारातील टोमॅटो आवक काहइशी वाढली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो पिकावर परिणाम होत आहे. यामुळे बाजारातील आवकही वाढली. त्यामुळे भावावर काहिसा दबाव आला. सध्या बाजारात टोमॅटोला गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. टोमॅटोचा भाव काही बाजारात एक हजार रुपयांपासून सुरु झाला. तर सरासरी भाव २ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होत जाईल असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tomato Market
Market Rate : भरीत वांग्यांना सरासरी २० रुपये दर

गव्हाच्या भावात मागील आठवड्यात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली होती. भाव सुधारणेला लागवडीच्या आकडेवारीचाही आधार मिळत होता. मागील आठवड्यात गव्हाची लागवड जवळपास ९ टक्क्यांनी पिछाडीवर होती. पण आजच्या अहवालात लागवड गेल्यावर्षीच्या लागवडीपेक्षा काहिशी अधिक झाल्याचे सरकारने स्पष्ट केले. पण बाजारातील गव्हाची आवक कमी आहे. त्यामुळे गव्हाचा भाव सरासरी २ हजार ८०० ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. आतापर्यंत गव्हाची लागवड गेल्यावर्षीच्या लागवडीच्या तुलनेत काहिशी आघाडीवर पोचली असली तरी अंतिम लागवड किती होते, पिकासाठी पुढील काळात वातावरण कसे राहते, यावर उत्पादन अवलंबून असेल. त्यामुळे गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज आहे.

देशातील बाजारात ज्वारीचे भाव तेजीत आहेत. आता पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारात सध्या ज्वारीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणं भाव मिळतोय. मालदांडी ज्वारीचे भाव सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजारांच्या दरम्यान पोचले. तर हायब्राडी ज्वारी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. पांढरी आणि दादर ज्वारीचा भाव ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसतो. बाजारातील आवक आणखी काही दिवस कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीच्या भावातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com