Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : खरिपातील उत्पादन घटल्यानंतर मक्याला काय भाव मिळतोय?

Market Bulletin : शेतीमालाच्या भावात चालू आठवड्यात नरमाई दिसून आली. तर काही माल वाढला होता.

Anil Jadhao 

Marketing Intelligence :

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटी सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे तब्बल ३.३४ टक्क्यांनी नरमले होते. सोयाबीनच्या वायद्यांनी १३.३० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४५८ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला. शेतकरी आता चांगल्या भावाच्या अपेक्षेने सोयाबीन मागे ठेवत आहेत. तर सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारातील स्थिती पाहता सोयाबीनच्या भावात १०० रुपयांपर्यंतचे चढ उतार सुरुच राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ६०० रुपयांपासून भाव मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारात कापसाची आवक आणि दरपातळी पाहता सध्याच्या दरापेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना अपेक्षित होता. पण कापड आणि सूत दरातील दबावामुळे कापसाचे भावही स्थिर आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. पुढील काळात देशातील बाजारात कापसाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

जिऱ्याच्या भावातील नरमाई कायम आहे. जिऱ्याचे भाव मागील महिन्याच्या तुलनेत वायदे आणि बाजार समित्यांमध्येही कमी झालेले आहेत. सणांच्या काळातही जिरा नरमल्याने भाव जास्त सुधारण्याची शक्यता कमीच आहे. पण नफावसुलीसाठी विक्री वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यातच वाढलेल्या मागणीत जिऱ्याला उठाव मिळत नव्हता. लागेल तेव्हढाच माल व्यापारी खरेदी करत होते. यामुळे भावावर दबाव आला. भाव कमी झाल्यानंतर जिऱ्याला मागणीही वाढली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४१ हजार ते ४३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये जिऱ्याचे व्यवहार ४५ हजार ते ४६ हजार रुपयांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जिऱ्याचे भाव पुन्हा सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

मक्याच्या भावात मागील आठवडाभरात क्विंटलमागं २५ रुपयांची सुधारणा अनेक बाजारांमध्ये दिसून आली. मक्याचे उत्पादन कमी झाल्याने आवक सराससरीपेक्षा कमीच होत आहे. तर मक्याला उठाव सरासरी दिसते. चालू खरिप हंगामात मक्याची लागवड तीन टक्क्याने अधिक झाली. पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसत आहे. खरिपातील मकाही बाजारात येत आहे. बाजारातील आवक गरजेप्रमाणे मिळत असल्याने दर स्थिर दिसतात. सध्या मक्याला भाव १ हजार ९०० ते २ हजार १२५ रुपयांच्या दरम्यान आहेत. मक्याला उद्योगांकडून मागणी सुधारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

हळदीच्या भावात मागील आठवडाभरात काहिशी सुधारणा झाली. सणांमुळे सध्या हळदीला उठाव वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सणांमुळे हळीच्या भावात सुधारणा होत आहे. दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा ५० ते ६० टक्क्यांनी कमी दिसते. असं असतानाही हळदीचा बाजार अपेक्षेपेक्षा दबावातच आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजारांचा भाव मिळत आहे. यंदाही हळदीची लागवड कमीच आहे. तर हळद पिकाला कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. तर स्टाॅकही कमी आहे. त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT