Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan Solapur: सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यातील २४४ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील सर्वाधिक २७ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला असून तर प्रत्येक तालुक्यातील २० ते २४ ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. .पहिल्या टप्प्यात कर वसुली करणाऱ्या ६६ ग्रापमंचायतीचा गौरव करण्यात आला असून आता दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबर रोजी करवसुली मोहीम राबवण्यात येणार आहे. आता राज्य शासनाच्या विविध योजनांची ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या अंमलबजावणीची तपासणी विभागप्रमुखांकडून सुरू करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली. .Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा.स्पर्धेतील सहभागी ग्रामपंचायतीकडून सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय व लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या मुद्यांवर १०० गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये ज्या ग्रामपंचायतीस सर्वाधिक गुण मिळतील, त्या गावाची निवड करण्यात येणार आहे..Samrudhha Panchayat Raj Abhiyan : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये ग्रामपंचायतींना लाखोची बक्षीस जिंकण्याची संधी.सुशासनयुक्त पंचायतीमध्ये नागरी सुविधा केंद्र, तक्रार निवारण, ग्रामपंचायत वेबसाईट, सीसीटीव्ही बसवणे, दफ्तर अद्ययावत व लेखापरीक्षण, आयुष्यमान भारत कार्ड, ग्रामविकास समिती कामकाज स्थापन करणे आदीचा समावेश आहे.सक्षम पंचायतअंतर्गत कर व पाणीपट्टी वसुली, लोकवर्गणी, स्वउत्पन्न वाढवण्यावर भर देणे आदींचा समावेश आहे..तालुकानिहाय सहभागी ग्रामपंचायत संख्या... अक्कलकोट : २५बार्शी : २७दक्षिण सोलापूर : २४करमाळा : २०माळशिरस : २३मोहोळ : २०माढा : २१मंगळवेढा : २१पंढरपूर : २४सांगोला : २०उत्तर सोलापूर : २०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.