Agrowon Podcast : बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा कमीच

Market Bulletin : देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या भावामध्ये चढ उतार सुरु आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होत असतो.
Market Bulletin
Market BulletinAgrowon

Bazar Bhav : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन आज दुपारपर्यंत १३.५८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी दुपारपर्यंत ४५८ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजाराचा विचार करता सोयाबीनचा भाव गुणवत्तेप्रमाणे ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. सोयाबीनला प्रक्रिया प्लांट्सकडून ५ हजार २५० ते ५ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक अद्यापही सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे आणखी काही दिवस सोयाबीनचा हा भाव बाजारात दिसू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात चांगली सुधारणा

कापसाची आवक अद्यापही कमीच आहे. त्यामुळे कापासाचा भावही टिकून आहे. देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये कापसाचे व्यवहार आज दुपारपर्यंत ५६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पार पडले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे ८०.८१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी कापसाची विक्री बाजाराचा आढावा घेऊनच करताना दिसत आहेत. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी दिसते. देशातील कापूस पुरवठा आणि मागणीचे गणित बघता कापसाच्या भावात पुढील काळात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : बाजारात सोयाबीन भावात ५० रुपयांची वाढ

देशातील बाजारात कांद्याच्या भावात सुधारणा चालू आठवड्यात कायम होती. कांद्याचा भाव आजही सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरु झाली. पण आवकेचे प्रमाण कमी आहे. परिणामी कांदा बाजारभाव सुधारत आहेत. लाल कांद्याची यंदा लागवड कमी झाली होती. त्यातच कांदा पिकाला कमी पाऊस आणि पावसातील खंडाचा मोठा फटका बसत आहे. यामुळे कांद्याची बाजारातील आवक कमीच आहे. त्यातच उन्हाळ कांद्याची आकही कमी होत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील कांदा आवक आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : राज्यातील बाजारात कांदा भावात काहिशी सुधारणा

बाजारात गव्हाला चांगलाच उठाव मिळत आहे. तर आवक मात्र सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे गव्हाच्या भावातील सुधारणा टिकून आहे. सध्या गव्हाला सरासरी ३ हजारांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात गव्हाचे भाव आणखी काहीसे सुधारु शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. यंदाही गहू उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. कारण यंदा लागवडच घटण्याची शक्यता असून पिकाला वाढती उष्णता आणि कमी पाण्याचा फटका बसू शकतो. त्यातच बाजारातील वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी सरकार बफर स्टाॅकमधील गहू बाजारात विकत आहे. त्यामुळे सरकारकडील स्टाॅकही कमी होत आहे. परिणामी पुढील काळातही गव्हाच्या भावाला आधार मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावात मागील आठवड्यापासून चांगली वाढ झाली. काही बाजारात तर ज्वारीचा कमाल भाव सहा हजारांवर पोचला. यंदा खरिपातील उत्पादन घटले. मागील हंगामातील रब्बी उत्पादनही कमी राहिले होते. यामुळे ज्वारीचा स्टाॅक कमी होता. परिणामी बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत घटलेली आहे. यामुळे ज्वारीचा सरासरी भाव ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. यंदा कमी पाऊस, कमी पेरा आणि पाणी टंचाईमुळे ज्वारीच्या उत्पादनात घटण्याचा अंदाज आहे.म्हणजेच यंदाही ज्वारीचा पुरवठा मागणीपेक्षा कमीच राहू शकतो. परिणामी ज्वारीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com