Agrowon Podcast : टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात चांगली सुधारणा

Market Bulletin : देशातील बाजारात लाल मिरची आणि मक्याचा भाव सुधारला तर सोयाबीन आणि कापसाच्या दरात चढ उतार सुरु आहेत.
Market Bulletin
Market BulletinAgrowon
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दराच चढ उतार सुरु आहेत. सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये दुपारपर्यंत काहिशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १३.६९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ४५७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील सोयाबीनचा बाजार मात्र काहिसा स्थिर होता. देशातील बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीन आवक सध्या कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे व्यवहारही धीम्या गतीने सुरु आहेत. सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस या पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : बाजारात सोयाबीन भावात ५० रुपयांची वाढ

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव स्थिर होते. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये नरमाई दिसून आली होती. पण आठवड्याच्या शेवटी वायदे काहीसे स्थिरावले होते. देशातील बाजारात कापूस खंडीचे व्यवहार ५५ हजार ते ५७ हजार रुपयांच्या दरम्यान झाले. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे ८०.८१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. बाजार समित्यांचा विचार करता आजही दरपातळी ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. बाजारातील कापूस आवकही काहीशी कमी झालेली दिसते. त्यामुळे कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याच्या भावात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा होत आहे. मक्याची बाजारातील आकही कमीच आहे. त्यातच खरिपातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा कमी पाऊस आणि पावसातील मोठ्या खंडांचा उत्पादकतेला फटका बसला. त्यातच इतर धान्यातील वाढीचा मक्याला आधार मिळत आहे. त्यामुळे मक्याच्या भावात मागील महिनाभरात क्विंटलमागं ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. मक्याचा बाजारभाव सरासरी २ हजार १०० ते २ हजार २०० रुपयांवर पोचला. रब्बीतील मका पिकालाही पाण्याची टंचाई भासू शकते. तसेच वाढत्या उष्णतेचीही समस्या भासू शकते. त्यामुळे मका बाजाराला चांगला आधार मिळू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : राज्यातील बाजारात कांदा भावात काहिशी सुधारणा

देशातील बाजारात यंदा लाल मिरची चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे उत्पादनात होणारी मोठी घट. मिरची पिकालाही कमी पावसाचा मोठा फटका बसला. महत्वाच्या लाल मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातील मिरची पिकालाही फटका बसला. लागवडही यंदा कमी झाली. यामुळे लाल मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १८ हजार ते ३२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्रातील मिरची पट्ट्यातही उत्पादनात घट येणार आहे. बदलत्या वातावरणाचं संकटही कायम आहे. त्यातच काढणीच्या काळात पाऊस आल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मिरचीच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात चांगली सुधारणा दिसून आली. बाजारातील टोमॅटो आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोचा भाव उत्पादन खर्चाच्या पातळीवर आल्याचे शेतकरी आता सांगत आहेत. त्यातच टोमॅटो पिकाला सध्या बदलत्या वातावरणाचा आणि कमी पावसाचा फटका बसत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी भावाअभावी प्लाॅट सोडून दिले होते. या कारणांनी पुढील काही दिवसांपासून आवक आणखी कमी होऊ शकते. त्यामुळे भावात काहिशी सुधारणाही दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com