मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या हत्येचा कट रचला आहे, अशी पोलिसात तक्रारपोलिसांनी बीडमधून दोघांना ताब्यात घेतले .Maratha Quota Activist Manoj Jarange Patil receives death threat: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या हत्येचा कट रचला आहे, अशी तक्रार जालना पोलीस (Jalna Police) अधीक्षक यांच्याकडे केली आहे. स्वतः जरांगे पाटील यांनी याबाबत काल मध्यरात्री पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांची हत्या करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी बीडमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे..मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबत जरागेंनी बुधवारी मध्यरात्री पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेत तक्रार दिली. या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी कारवाई करत बीड जिल्ह्यातील गेवराई येथून दोघांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली जात आहे. जर या प्रकरणात काही ठोस आढळून आल्यास संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बन्सल यांनी म्हटले आहे..Manoj Jarange Patil: सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर रस्त्यावर उतरू ; मनोज जरांगे पाटील .'माझ्या हत्येचा कट कसा आणि कोणी शिजवला? यामागे कोणत्या नेत्याच्या हात आहे?' हे मी उद्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह सांगणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. .मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी अंतरवाली सराटीतून आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर त्यांचे आंदोलन एकदा मुंबईच्या वेशीवर धडकले होते. तर दुसऱ्यांदा त्यांनी मुंबईत धडक दिली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदबाद गॅझेट लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला..Manoj Jarange Patil: दिवाळीनंतर शेतकरी नेत्यांना एकत्र करून रणनीती ठरवणार; मनोज जरांगे पाटील.दरम्यान, राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा नेते असे संघर्ष सुरु आहे. छगन भुजबळ सरकारमध्ये वाद निर्माण करुन जातीय दंगली घडवणार आहेत. ते बीडमध्ये दहशत निर्माण करतील, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. तर छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी नेत्यांच्या महाएल्गार सभेत जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी यावेळी बोलताना जरांगे पाटील यांचा उल्लेख अंतरवालीचे दरिंदे पाटील असा केल्याने वाद टोकाला गेला होता. भुजबळ ओबीसी आणि मराठ्यामध्ये तणाव निर्माण करत असल्याचे प्रत्युत्तर जरागेंनी दिले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.