Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोचे बाजारभाव स्थिर आहेत; तसेच, कापूस, सोयाबीन आणि टोमॅटोचे सध्याचे भाव काय आहेत?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, आले आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीनच्या भावात आज काहीशी वाढ झाली होती. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.०७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही भाव आज कायम होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजारात सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सुरु होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूसात चढ उतार

कापसाच्या भावात आज पुन्हा चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आजही ७० सेंट प्रतिपाऊंडपेक्षा कमीच राहत आहेत. आज दुपारपर्यंत ६९सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान कायम होते. तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन ५७ हजार ५०० हजार रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. तरीही कापसाचे भाव ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचा भाव स्थिरावला

टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे. आजही टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २ हजारांपेक्षा कमी दिसत आहे. तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

केळीला उठाव कायम

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती. सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत. तर यापुढे नवरात्रीमुळेही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याचे भाव टिकून

आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत. आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याची सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ९हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT