Banana Rate : केळीचा दर दीड हजारावर स्थिरावला

Banana Market : यंदा या भागातील केळीला गेल्या महिनाभरापासून दीड हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळतो आहे.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदा या भागातील केळीला गेल्या महिनाभरापासून दीड हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळतो आहे. मध्यंतरी वादळ, अतिपावसाने केळीचे नुकसान झाल्याने आवक कमी असल्याने दर वाढलेले मिळत असल्याचे केळी उत्पादक सांगत आहेत. या भागातील केळीचा दर हा ‘पांढरी’ बोर्डाद्वारे काढला जातो. दुसरीकडे शेजारच्या ‘बऱ्हाणपूर’ बोर्डाचे दर याहीपेक्षा अधिक असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी तेल्हारा, अकोट तालुक्यांत तसेच जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यात केळीचे उत्पादन काढले जाते. अकोट तालुक्यातील पणज परिसर हा केळी उत्पादनाचे माहेरघर झालेला आहे. यंदा केळीची आवक कमी होत असल्याने मागील महिनाभरापासून केळी १५०० रुपये दराने विकत आहे.

Banana
Banana Cultivation : खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू

दोन दिवसांपूर्वी हाच दर १६५० पर्यंत गेला होता. नंतर पुन्हा यात घट होऊन १५०० पर्यंत स्थिरावला. या वर्षी केळीची अपेक्षित आवक होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या बागांमध्ये जून महिन्यात पाऊस व वादळाने मोठे नुकसान केलेले आहे.

अनेक बागा जमीनदोस्त झाल्या होत्या. परिणामी, केळीचे उत्पादन घटले. बाजारात मागणी असतानाही पुरवठा कमी होत असल्याने आता दरात तेजी सुरू झालेली आहे. अकोल्यात केळीची किरकोळ विक्री डझनाला ४० ते ६० रुपयांपर्यंत सध्याच होत आहे. आगामी नवरात्रात हा दर आणखी वाढेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

नवीन लागवडीकडे कल

या वर्षात केळीला मिळत असलेला दर, रोजगार हमी योजनेतून हेक्टरी मिळत असलेले दोन लाख ७० हजारांचे पाठबळ यामुळे केळी लागवडीकडील कल वाढतो आहे. शेतकरी टिश्‍युकल्चर रोपांची लागवड करीत असून, विविध पुरवठादार कंपन्यांनी या भागात आधीच बुकिंग करून घेतलेली आहे.

Banana
Banana Market : केळीच्या आवकेत किंचित वाढ

शेतकऱ्यांना केळीचे एक रोप बांधावर सुमारे १६ रुपयांपर्यंत पडते आहे. लागवड, व्यवस्थापनाचा खर्च वाढला तरीही इतर पिकांच्या तुलनेत केळीचे पीक परवडत असल्याने शेतकऱ्यांचा कल केळीकडे आहे.

जूनमध्ये आमच्या भागात बऱ्याच बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. झाडे तुटून पडल्याने केळीचे उत्पादन झाले नाही. आता ज्या बागांमध्ये माल आहे, तोही मागणी पूर्ण करेल एवढा निश्‍चितच नाही. यामुळे बाजारात केळीचे दर वाढलेले आहेत. आगामी नवरात्रामध्ये केळी आणखी भाव खेचेल, असे दिसते.
- सचिन कोरडे पाटील, केळी उत्पादक, हिंगणी, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com