Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : आल्याचे भाव टिकून ; कापूस, सोयाबीन, गहू, मका काय आहेत आजचे दर ?

Market Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. तर कापसाचे वायदे काही आठवड्यानंतर पुन्हा एकदा ८१.९१ सेंटवर पोचले आहेत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम आहेत. तर कापसाचे वायदे काही आठवड्यानंतर पुन्हा एकदा ८१.९१ सेंटवर पोचले आहेत. त्याचा परिणाम देशातील वायद्यांवरही दिसून आला होता.

तर बाजार समित्यांमधील भावपातळीत काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असाही अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मंदीतच आहेत. सोयाबीनची आवकही सरासारीच्या तुलनेत चांगली दिसत आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. तरीही सोयाबीन ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव नरमले होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.

आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यातच उत्पादकतेला मोठा फटका बसल्याचे शेतकरी  तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत.

उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे. तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT