Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा यांचे काय आहेत भाव ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Market Bulletin : देशात कापसाच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. सीसीआयनेही कापूस खंडीचे भाव कमी केले. त्यामुळे कापूस बाजारावर दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव आत काहीसे स्थिरावले आहेत. आज दुपारपर्यंत कापूस ८२.८९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते.

तर देशातील वायदे ६१ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवकही घटली आहे. तर बाजारातील कापूस भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहेत. कापूस बाजारात आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कांद्याचे भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, गहू तसेच हरभरा यांचे दर ?

देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आजही ५० रुपयांनी वाढवले होते. आज प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा याचाही आधार सोयाबीनला मिळत आहे.

सोयाबीनचे भाव बाजार समित्यांमध्ये ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीन बाजारात आणखी काहीशी वाढ अपेक्षित आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांन सांगितले. 

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय ? कापूस, सोयाबीन , तूर, टोमॅटो यांचे काय आहेत बाजारभाव?

तुरीच्या भावातील तेजी कायम आहे.  वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला.

तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो. बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे.

आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com