Agrowon Podcast : कापसामध्ये चढ उतार सुरुच ; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, कांदा काय आहेत दर ?

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture Market Agrowon
Published on
Updated on

Market Bulletin : कापूस बाजारातल चढ उतार काय आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील कापसाची खरेदी विक्री याचा कापूस बाजारावर परिणाम दिसून येत आहे. कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं अनेक ठिकाणी ४०० ते ५०० रुपयांनी कमी झाले.

कापसाला आज सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा यांचे काय आहेत भाव ?

सोयाबीनच्या भावातील चढ उतारही कायम आहेत. सोयाबीनची भावपातळी अनेक बाजारांमध्ये आज क्विंटलमागे ५० ते ७५ रुपयांनी कमी झाली होती. प्रक्रिया प्लांट्सनीही आपले खरेदीचे भाव ४ हजार ७५० ते ४ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान ठेवले होते. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.

बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात मोठी नरमाई आलेली दिसते. पण देशातील बाजारात सोयाबीन भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांदा भावावरील दबाव कायम आहे. बाजारातील आवक कमी असतानाही भाव कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. कांदा भाव निर्यातबंदीमुळे दबावात आहेत.

नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचाही बाजाराला आधार मिळताना दिसत नाही. सध्या भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market
Jowar Market : ज्वारी उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम आहे. बाजारातील टोमॅटोची आवक कायम आहे. आवक चांगली असल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. पाणी टंचाईमुळे उत्पादनाला फटका बसला तरी आवकेचा दबाव दिसतो.

टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. किमान भाव ८०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भावपातळी एक हजार ते ११०० रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे.

सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com