Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हरभरा दरावर दबाव कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत हरभरा दर

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तीळ आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहिशी वाढ दिसून आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पुन्हा नरमाई आली. सोयाबीनचे वायदे आज दुुुपारपर्यंत ९.९५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड २९१ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६८.८९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५५ हजार ६१० रुपये भाव मिळाला. बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत. देशात कापसाचा सरासरी भाव आज ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भाव टिकून

कांद्याच्या भावातील तेजी टिकून आहे. बाजारातील कांद्याची आवक कमी तर उठाव चांगला आहे. त्यामुळे सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या कांद्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. गेल्या हंगामात रब्बी हंगामात घटलेले उत्पादन आणि वातावरणाचा बसलेला फटका यामुळे कांद्याची उपलब्धता सध्या कमी आहे. खरिपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील. परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT