Soybean Market : विदर्भातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा

Soybean Rate : विदर्भातील अमरावती बाजार समितीमध्ये गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत २ लाख ८७ हजार क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभा निवडणुकीत सोयाबीन दरवाढीचा मुद्दा कळीचा ठरला आहे. याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता पाहता दरवाढीच्या अनुषंगाने शासनाकडून हमीभावाने खरेदी करता सोयाबीन ओलावा १२ टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बाजारात काही अंशी सुधारणा अनुभविण्यात आली असून, प्रतिक्विंटल २०० ते ३०० अशी वाढ नोंदविण्यात आली आहे.

विदर्भातील अमरावती बाजार समितीमध्ये गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत २ लाख ८७ हजार क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. या बाजार समितीत दररोज सरासरी १५००० क्विंटलपेक्षा अधिकची आवक होत असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबरच्या सुरुवातीला बाजारात सोयाबीनची आवक होताच ३२०० ते ३८०० या दराने सोयाबीनचे व्यवहार होत होते.

Soybean
Soybean MSP : सोयाबीनचा हमीभाव यंदाही मृगजळच

केंद्र सरकारने सोयाबीनला ४८९२ रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. बाजारात मात्र हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतले जात असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटल मागे एक हजार ते पंधराशे रुपयाचे नुकसान होत होते.

याच दरम्यान सोयाबीन सह इतर खाद्यतेलाच्या दरात सुधारणा होत गेल्याने सोयाबीनचे दरही काहीसे वधारले. ३८०० ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर सोयाबीनला मिळू लागला. मात्र या व्यवहारात देखील शेतकऱ्यांना ८०० ते १००० रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढतं होता. त्याचा फटका महाराष्ट्रासह काही राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता लक्षात घेता सोयाबीनमध्ये तेजीसाठी काय करता येईल यावर पुन्हा केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले. सोयाबीनमध्ये दर वाढीकरिता ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, खरेदी करता ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के वरून पंधरा टक्के करणे अशा अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.

Soybean
Soybean Market : सहा हजार रुपयांनी सोयाबीनची शासनालाच करावी लागेल खरेदी

त्यातील आधारभूत किमतीने खरेदी करता ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवित तशी अधिसूचना देखील १५ नोव्हेंबर रोजी काढली.

याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसत असून, एकाच दिवसात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपये अशी वाढ सोयाबीन दरात नोंदविण्यात आली आहे. अमरावती बाजार समितीत शनिवारी (ता. १६) सोयाबीनला ४००० ते ४३०० असा दर मिळाला. यापुढील काळात सोयाबीन दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे.

...असे आहेत दर (प्रतिक्विंटल रुपयांत)

शेगाव (बुलडाणा) : ३५००-४०००

कारंजा (वाशीम) : ४००५-४२८०

चांदूरबाजार (अमरावती) - ४०००-४३४०

यवतमाळ : ३८००-४३००

नागपूर : ४०००-४३१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com