Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात

Onion Rate : गत रब्बी उन्हाळ कांदा हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड जवळपास ५० हजार हेक्टरने कमी झाली होती.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : गत रब्बी उन्हाळ कांदा हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याची लागवड जवळपास ५० हजार हेक्टरने कमी झाली होती. परिणामी, उत्पादन घटणार हे निश्‍चित होते. त्यातच कांदा काढणीपश्‍चित तापमान वाढ व वातावरणीय बदलामुळे कांद्याची साठवणूक क्षमता संपुष्टात आली.

अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादकांनी दिवाळीपर्यंत कांदा टिकवला. आता जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजारात आवक कमालीची घटली आहे. मागणीच्या तुलनेत ती कमी असल्याने कांद्याला सरासरी ५५०० रुपयांवर दर मिळत आहे. तर किमान १२०० ते कमाल ७१७१ रुपयांचे दर मिळाले आहे.

Onion Market
Onion Market : नव्या लाल कांद्याला ४ हजारांचा भाव

गत रब्बी उन्हाळ कांदा हंगामात पाणीटंचाईमुळे लागवडी ५० हजार हेक्टरवर दोन वर्षीच्या तुलनेत कमी होत्या. त्यात तापमान वाढ व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकता व गुणवत्ता कमी झाली. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची कांद्याची साठवणूक केली; मात्र सड वाढली. परिणामी, साठा संपुष्टात येऊन पुरवठा कमी होत असल्याने दरात सुधारणा दिसून आली. मात्र सध्या कांदा शेतकऱ्यांकडे नसल्याने ती सध्या शेतकऱ्याच्या पथ्यावर नाही.

नवीन उन्हाळ कांदा काढणी सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सरासरी १२०० ते १३०० रुपये दर मिळत होते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने आवक कमी होत गेली. तर दिवाळीपर्यंत आवक बऱ्यापैकी होती. मात्र दिवाळीनंतर आवक कमी झाली आणि दरात सुधारणा दिसून आली आहे.

Onion Market
Onion Market : आवक मंदावल्याने किरकोळ बाजारात कांद्याला ८० रुपये दर

सध्या लासलगाव, पिंपळगाव बसवंत अशा प्रमुख बाजारांत आवक कमी झाली आहे. मात्र कसमादे भागातील कळवण, सटाणा, उमराणे यांसह येवला बाजारात आवक होत आहे. अनेक शेतकरी प्रामुख्याने प्रयोगशीलतेने कांदा साठवणूक करून दिवाळीच्या नंतरही टप्प्याटप्प्याने विक्री करतात. मात्र बहुतांश बाजारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली तर नवीन खरीप लाल कांद्याची आवकही अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.

कांद्याची सोमवारी (ता. ११) झालेली आवक व दर स्थिती

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

लासलगाव...१,८७८...३,३०१...६,०७१...५,६००

पिंपळगाव बसवंत...५,२००...३,३००...७,१५१...५,७००

मुंगसे (मालेगाव)...१,६७५...१,५००..५,२२०...४,३२०

विंचूर (लासलगाव)...८५०...३,०००...५,५९०...५,३००

उमराणे...४,५००...२,०००...५१५१...४,५००

कळवण..९,८५०...२,०००...६,४००...५१००

सटाणा...६,३१०...२,१०५...६,३६०...५,५७०

देवळा...१,७९०...१,७००...५,४०५...५,०००

चांदवड...७००...१,२००...५,६९५...४,७१०

मनमाड...९०...२,६६०...४,५५१...४,३०१

येवला...२,१५०...२,०००...५,८५१...४,७००

बाजारातील सद्यःस्थिती

- सप्टेंबरनंतर कांद्याची आवक कमी.

- मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने पुरवठ्यावर ताण.

- खरीप कांद्याची उपलब्धता कमी तर उन्हाळा कांद्याचा साठा अंतिम टप्प्यात.

- कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांकडून चांगल्या प्रतवारीच्या कांद्याला होती पसंती.

- पुरवठ्यावर दबाव असल्याने कांदा दरात वाढ.

जवळपास ९० टक्क्यांवर उन्हाळ कांदा संपलेला आहे. थोड्याफार शेतकऱ्यांकडे कांदा टिकला. यंदा वातावरण बदलांचा मोठा फटका बसल्याने कांद्याचे नुकसान वाढले. आता बाजारात भाव दिसत असला तरीही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसलेली स्थिती आहे.
- सदूभाऊ शेळके, कांदा उत्पादक, मानोरी, ता. येवला
उन्हाळ कांद्याचे जे माल दुसऱ्या बाजारात पोहोचणार नाहीत, त्यांना दर कमी आहेत. मात्र गुणवत्तेनुसार कांद्याला चांगले दर आहेत. मॉन्सूनोत्तर पावसाचा खरीप कांद्याला फटका आहे. त्यामुळे आवक कमी दिसून येते. मात्र पुढील १५ दिवसांत आवक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com