Market Bulletin AGrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : नाफेडची खरेदी, कमी आवकेमुळे कांदा भावात सुधारणा !

Market Bulletin : नाफेडने नगर आणि नाशिक जिल्ह्यात कांदा खेरदी सुरु केली. नाफेड कांद्याला २ हजार ४१० रुपये भाव देत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी उद्यापासून कांद्याची खरेदी सुरु करणार आहेत.

Team Agrowon

1. कापसाच्या भावात मागील दोन दिवसांपासून चढ उतार सुरु आहेत. वायद्यांमध्येही हीच स्थिती दिसते. कापूस भाव मागील दोन दिवसांमध्ये अनेक बाजारात १०० रुपयाने कमी झाले. तर वायद्यांनी आज दुपारपर्यंत मान टाकली होती. बाजार समित्यांमध्ये कापसाला आज ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर वायद्यांमध्ये दुपारी १४० रुपयांची घट होऊन ५९ हजार ५६० रुपयांचा टप्पा गाठला होता. कापूस भावात चढ उतार दिसत असले तरी भाव पुन्हा वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. सोयाबीनच्या भावात मोठे चढ उतार येत आहेत. देशातील प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचा भाव क्विंटलमागं ७५ रुपयांनी कमी केला होता. तर बाजार समित्यांमधील भाव सरासरी पातळीवर स्थिर होता. सोयाबीनला बाजारात आज सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला. देशात सोयाबीनचा शिल्लक स्टाॅक सध्या विक्रमी पातळीवर आहे. त्यामुळे भावात लगेच वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले.
 

3. राज्यातील बाजारात शेवग्याची आवक मर्यादीत होत आहे. पण शेवग्याला चांगला उठाव आहे. यामुळे शेवग्याचे भाव टिकून आहेत. शेवग्याला बाजारात सध्या सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पण सध्या राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने दडी दिली. महिनाभर पाऊस नाही. त्यामुळे यापुढील काळात शेवग्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी शेवगा चांगलाच भाव खाऊ शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

4. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा भाव स्थिरावलेला दिसतो. देशातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला होता. पण जवळपास आठवडाभरापासून दरातील नरमाई थांबली होती. टोमॅटो आवकेचा दबावही स्थिरावला. यामुळे टोमॅटोचे भाव सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. पण भाव यापेक्षा कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापारी सांगतात. टोमॅटोचा भाव ३ हजारांच्या दरम्यान राहू शकतो, असाही अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 


5. नाफेडने नगर आणि नाशिक जिल्ह्यात कांदा खेरदी सुरु केली. नाफेड कांद्याला २ हजार ४१० रुपये भाव देत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी उद्यापासून कांद्याची खरेदी सुरु करणार आहेत. पण नाफेडच्या खेरदीत पारदर्शकता नसते, अशी टिका शेतकरी करतात. तर लिलाव सुरु होणार असल्याने कांदा भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज नाशिकमधील काही बाजारांमध्ये काही प्रमाणात कांदा आला होता. या कांद्याचे लिलावही झाले. आज विंचूर बाजारातही गुणवत्तेच्या कांद्याला कमाल २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. तर राज्यातील सरासरी भावपातळी आज १ हजार ९०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती.

कांद्याचे लिलाव सुरु झाल्यानंतर बाजार पुन्हा सुऱळीत होईल. कारण चाळींमध्ये कांद्याचा स्टाॅक कमी आहे. सध्या टिकणक्षमता कमी झालेलाच कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येतोय, असे व्यापारी सांगत आहेत. तर पुढील काळात कांद्याची टंचाई वाढत जाण्याचा अंदाज आहे. शिल्लक स्टाॅकमध्ये मोठी घट आणि खरिपातील घटलेली लागवड यामुळे बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे कांद्याचे भाव तेजीतच राहू शकतात. पण सरकारच्या धोरणांची टांगती तलवार कायम असेल. पण तरीही कांद्याचे भाव वाढत जाईल असं जाणकारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hailstorm: राज्यात आज, उद्या गारपीटीचा अंदाज; पुढील ३ दिवस राज्यभरात वादळी पावसाला पोषक हवामान

Saklai Irrigation Project: साकळाई उपसा सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करा

Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आणखी ४३ कोटींचा निधी मंजूर

Mega International Agri Market: ‘वाढवण’मध्ये बाराशे एकरांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची उभारणी

Banana Crop Management: केळी बागेच्या अवस्थेनुसार व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT