
Nashik News : निफाडमध्ये सरासरीपेक्षा १२५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. मात्र, पावसाचा खंड, त्यातच काही शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केल्याने पिकावर विपरित परिणाम दिसत आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी (ता. निफाड) येथील शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. त्यात सोयाबीन पिवळे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तज्ज्ञांनी उपाययोजना सूचविल्या आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या पेरण्यांमध्ये चांगली जोमदार वाढ दिसून आली आहे. मात्र नंतरच्या टप्प्यात झालेल्या पेरण्या काहीशा अडचणीत सापडल्या आहेत. वाढीच्या अवस्थेत पावसाने ओढ दिली.
त्यामुळे उशिराने पेरणी झालेल्या पिकाला पाऊस व तणनाशक फवारणीचा फटका बसला. सद्य:स्थितीत काही भागांत सोयाबीनचे पीक पिवळे पडलेले दिसून येत आहे. सध्या पाऊस नसल्याने पिकाची समाधानकारक वाढ दिसून येत नाही व कमी पावसामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये न घेता आल्यामुळे सोयाबीनचे पीक लहान अवस्थेत पिवळे-पांढरे पडले आहे.
काही ठिकाणी जमिनीत लोहाची कमतरता दिसून येते तर काही जमिनीत चुनखडीचे जास्त प्रमाण व जमिनीचा सामू ७.५ पेक्षा अधिक असल्यास त्यातील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो. तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.