Agriculture Market
Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याचा बाजारभाव स्थिर; कापूस, सोयाबीन, मका, तसेच लसूण दर काय आहेत?

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे ११.७० डाॅलर प्रतिबुशेल पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३४७ डाॅलर प्रतिक्विंटलवर पोचले होते. तर देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत.

सरासरी दरपातळी मात्र कायम आहे. देशात सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजाराची स्थिती पाहता, सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील तीन दिवसांपासून कापूस भावाताली नरमाई थांबली असून दरात काहीशी सुधारणा देखील झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आजही दबावात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा वायदा ८१ सेंट प्रतिपाऊंडवर होता. तर देशातील मे महिन्यातील वायदे ५८ हजार ७८० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर बाजातील आवक कमी झाली असून बाजारभाव आजही ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाहीत. सरकारची निर्यातबंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे. त्यामुळे सध्या कांदा भाव १००० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे. पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे.

तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे. सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे. तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.

त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT