Market Bulletin : देशातील बाजारात कापसाच्या भावातील नरमाई काहीशी थांबलेली दिसते. बाजारातील आवकही कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज काहीसे वाढून ८१.७२ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. देशातील वायदेही वाढले होते.
देशातील वायदे ५८ हजार ७२० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये आज ७ हजार २०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीन बाजारातील नरमाई अजूनही कायम आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे ११.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३४२ डाॅलर प्रतिटनांवर होते.
देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये चढ उतार सुरुच आहेत. देशातील बाजारात आज सोयाबीनला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात गव्हाच्या भावातील वाढ कायम आहे. आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याने भावाला चांगला आधार मिळत आहे. सरकारची खरेदी सुरु असल्याने हमीभावाचाही आधार आहे. तसेच यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले.
त्यामुळे गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत. देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आल्याचा भाव राज्यातील बाजारांमध्ये टिकून आहे. आल्याचे उत्पादन यंदा घटल्यामुळे बाजारातील आवक कमी आहे. तर दुसरीकडे आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे.
सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत. तर बाजारातील आवक वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासू लसणाचे भाव क्विंटलमागे २० ते ३० टक्क्यांनी कमी आले आहेत. किरकोळ बाजारातही लसूण नरमला आहे.
सध्या बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे चढ उतार राहतील, असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.