Market Bulletin:
लिंबू दरात चढ उतार
वादळी पावसामुळे लिंबू बागांना फटका बसत आहे. फळगळ होत असल्याने बाजारातील आवकही वाढली होती. मात्र ३ दिवसांपासून लिंबाच्या दरात काहीशी स्थिरता आली होती. सध्या लिंबू ४ हजार ते ५ रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. लिंबाच्या दरात स्थिरता आल्यानंतर काहीसे चढ उतारही सुरु आहेत. यंदा लिंबुच्या बागाला सुरुवातीपासूनच फटका बसत आहे. पुढच्या काळात बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे लिंबाच्या दरातही चढ उतारही कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
बाजरीचे भाव स्थिर
रब्बी बाजारी बाजारात आल्यानंतर दरावरही दबाव दिसून आला. बाजारीला सध्या उठावही चांगला दिसत आहे. मात्र वाढलेल्या उत्पादनामुळे पुरवठाही चांगला आहे. त्यामुळे वाढलेल्या मागणीचा बाजरीच्या दराला आधार मिळाला नाही. बाजरीला सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. पुढील काही आठवडे बाजारीची आवक स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तसेच मागणीही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजरीचे दरही स्थिर दिसू शकतात, असा अंदाज बाजारी व्यापारी व्यक्त करत आहेत.
लसणाची आवक कायम
बाजारात लसणाची आवक चांगली सुरु आहे. मालातील ओलावा देखील कमी होताना दिसत आहे. पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे. लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
हिरव्या मिरची टिकून
राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
केळीच्या दरावर दबाव
केळीच्या भावात मागील ५ दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढे मागणीही असल्याचे दिसते. मात्र केळीचे खरेदीदर एका आठवड्यातच ३०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. सध्या बाजारात केळीला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. बाजारात इतर फळांची वाढलेली आवक आणि पावसाळी वातावरणामुळे मागणीवर झालेल्या परिणामामुळे केळीचे दरही कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. केळी दरातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.