Ginger Rate: आले दर वाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

Farmer Concern: बुलडाणा जिल्ह्यात आल्याची काढणी सध्या जोमात सुरू असून, शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना जोरदार धक्का बसला आहे. उत्पादन खर्चाचाही ताळमेळ बसविताना घालमेल होत आहे.
Ginger Farming
Ginger FarmingAgrowon
Published on
Updated on

Buldana News: बुलडाणा जिल्ह्यात आल्याची काढणी सध्या जोमात सुरू असून, शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांना जोरदार धक्का बसला आहे. उत्पादन खर्चाचाही ताळमेळ बसविताना घालमेल होत आहे. आले उत्पादकांना सध्या अडचणीतून सामोरे जावे लागते आहे. सध्या बाजारात आल्याला अवघा दर क्विंटलला २३०० ते २५०० रुपयांदरम्यान आहे.

गेले दोन-तीन हंगाम आल्याला चांगला दर मिळाला. परिणामी, लागवड वाढली. यंदा हे चक्र उलटे फिरले. बाजारात अडीच हजारांच्या आत आले विकत आहे. त्यातच आले काढण्यासाठी ४०० रुपये, वाहतूक १५० रुपये व मार्केट खर्च १५० ते २०० रुपये असा एकूण काढणी ते विक्रीपर्यंत सातशे ते आठशे रुपये खर्च येत आहे.

Ginger Farming
Ginger Price: आले पिकास गाडीला सात हजार रुपये

काही व्यापारी थेट शेतातच काढणीसह १३०० ते १५०० रुपये दराने मागणी करीत आहेत. पाऊस पडल्यानंतर व मध्य प्रदेशातून आलेले मजूर परत गेल्यानंतर दरात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मागील दोन हंगामांत आले विक्रमी दराने विकले गेले होते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने लागवड केलेली आहे. मात्र सध्याच्या बाजारभावामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढविण्याची शक्यता आहे.

Ginger Farming
Ginger Rate: अमरावती, नागपूर बाजारात आले दर दबावात

लोणार तालुक्यातील येसापूर येथील शेतकरी प्रकाश धांडे यांनी यंदा दोन एकर क्षेत्रांवर आल्याची लागवड केली आहे. ‘मागील वर्षी चांगला दर मिळाल्यामुळे आम्ही यंदा लागवड वाढवली. मात्र सध्या मिळणारा दर उत्पादन खर्चही भरून काढत नाही. शेतात आले तयार असून, मजुरी, वाहतूक आणि प्रक्रिया खर्च विचारात घेतल्यास मोठे नुकसान ठरणार आहे,’ असे धांडे यांनी सांगितले.

काही भागांत अनुकूल हवामानामुळे आल्याचे उत्पादन भरघोस झाले आहे. तसेच बंगलोर येथील आले मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे बाजारात पुरवठा वाढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागणी अपेक्षेप्रमाणे नसल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे आले साठवून ठेवण्यासाठी सुसज्ज सुविधा नाहीत. त्यामुळे दर कमी असतानाही विक्री करावी लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com