Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मालेगाव बाजार समितीत मक्याला २३११ रुपये भाव

Maize Rate Update : मालेगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मका, अन्नधान्य, कडधान्य, भुईमुंग शेंगा व भुसार माल यांची आवक वाढत आहे.

Team Agrowon

Nashik News : मालेगाव येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मका, अन्नधान्य, कडधान्य, भुईमुंग शेंगा व भुसार माल यांची आवक वाढत आहे. बाजारभाव चांगले मिळत आहेत. शनिवारी (ता. ४) कोरड्या मक्यास कमीत कमी २ २०० तर जास्तीत जास्त २३११ रुपये भाव मिळाला. २३० ट्रॅक्टर मक्याची आवक होती.

बाजारात ओला मका देखील विक्रीसाठी येत आहे. ओल्या मक्यास कमीत कमी २ हजार तर जास्तीत जास्त २ हजार १५० रुपये भाव होता. सरासरी बाजारभाव २ हजार १०० रुपये होता. ओल्या मक्याची आवक साधारणत: ५० ट्रॅक्टर होती.

बाजार समितीत मका व इतर शेतमालाची आवक दिवसागणिक वाढत आहे. गहू उच्चांकी ३ हजार २५ रुपये तर बाजरी २ हजार ८०० रुपये क्विंटलने विकली गेली. शेतकरी बांधवांनी विक्री केलेल्या मालाची रक्कम रोख स्वरुपात अदा केली जात आहे.

शेतकऱ्यांची मका विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी रोज सकाळी दहाला, दुपारी एकला, सायंकाळी पाच व सातला लिलाव केले जाणार आहेत. मालेगाव तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी मका व इतर शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असे आवाहन समितीचे संचालक व मका खरेदीदार व्यापारी भिका कोतकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच

Agriculture Inflation: भूलभुलय्या महागाई दराचा!

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT