Soybean Market : अकोल्यात सोयाबीनची ४६०० रुपये क्विंटलने विक्री

Akola Soybean Market : खरीप हंगाम तोंडावर आला असून भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Akola Soybean Bajar Bhav : खरीप हंगाम तोंडावर आला असून भाववाढीच्या अपेक्षेने साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीच हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक सुरु आहे. दर सरासरी ४६०० रुपये क्विंटल आहे.

Soybean Market
Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादकांनी असा काय गुन्हा केला?

यंदाच्या हंगामात शेतकरी सोयाबीनच्या दरवाढीसाठी गेले अनेक महिने प्रतीक्षा करीत थांबलेले आहेत. शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल सोयाबीन अजूनही शिल्लक आहे. परंतु त्याचा दर पाच हजारांवर पोचलेला नाही.

दरम्यान, खरीप हंगामासाठी पैशांची तजवीज करण्याच्या उद्देशाने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या आवकेने उसळी घेतली आहे. वास्तविक शेतकरी सोयाबीनला किमान सहा ते सात हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळेल, या अपेक्षेने थांबला होता.

Soybean Market
Soybean Market Update : सोयाबीन बाजारावर सतत दबाव का येतोय?

सध्या मात्र, बाजार समितीत सोयाबीनचा दर किमान ४१०० रुपयांपासून सुरु होऊन कमाल ४९४५ रुपये मिळत आहे. शनिवारी (ता. १०) या बाजार समितीत सुमारे २७०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. आठवडाभरातील आवक पाहिली तर १०० ते २०० रुपयांनी दरात चढ-उतार झाला.

सोयाबीन विक्रीशिवाय पर्याय नाही

पेरणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असून बी-बियाणे, खते खरेदीसह मशागतीसाठी पैशांची शेतकऱ्याला गरज भासते. त्यामुळे आता साठवून ठेवलेले सोयाबीन बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही.

बाजारात सोयाबीन, तूर, हरभरा या तीन शेतीमालाची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आणखी काही दिवस ही आवक कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com