Maharashtra Kesari : फुलगाव येथे उद्यापासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Wrestling Competition : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान फुलगाव येथे होत आहेत.
Maharashtra Kesari
Maharashtra KesariAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान फुलगाव येथे होत आहेत.

फुलेगाव (ता, हवेली) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीची माहिती नुकतीच स्पर्धेचे आयोजक व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.

Maharashtra Kesari
Mahila Maharashtra Kesari Kusti : अकलूजमध्ये रंगला ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धांचा आखाडा

या स्पर्धेत ३६ जिल्हा व ६ महानगर पालिका क्षेत्रातील ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० व माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर व २ कुस्ती मार्गदर्शक तर १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा सहभाग असेल.

Maharashtra Kesari
Maharashtra Kesari : मानाची गदा, स्कॉर्पिओ अन् बुलेट, धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार

त्यानुसार ८४० कुस्तीगीर, ८४ कुस्ती मार्गदर्शक व १४२ व्यवस्थापक, ८० पंच व ५० पदाधिकारी अशा एकूण ११०० जणांचा या स्पर्धेत सहभाग असेल.

कुस्तीगीरांचे आगमन व वजने आज (ता. ६) होतील. उद्या (ता. ७) सायंकाळी पाच वाजता कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदींच्या हस्ते होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com